मेजेलनची सामुद्रधुनी
मेजेलनची सामुद्रधुनी ही दक्षिण अमेरिका खंडाला तिएरा देल फ्वेगो बेटापासून वेगळी करणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी अटलांटिक महासागराला प्रशांत महासागरासोबत जोडणारा सर्वांत महत्त्वाचा नैसर्गिक जलमार्ग आहे.
मेजेलनची सामुद्रधुनी सुमारे ५७० किमी लांब व किमान २ किमी रुंद आहे. फर्डिनांड मेजेलन ह्या पोर्तुगीज खलाशाने १५२० साली सर्वप्रथम ह्या सामुद्रधुनीमधून मार्ग काढला.