मेघालय विधानसभा
Unicameral legislature of the Indian state of Meghalaya | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Government of Meghalaya | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | मेघालय | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
मेघालय विधानसभा हे भारताच्या मेघालय राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६० आमदारसंख्या असलेल्या मेघालय विधानसभेचे कामकाज शिलाँग शहरामधून चालते. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे मेतबाह लिंगदोह हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री कॉनराड संगमा विधानसभेचे नेते तर मुकुल संगमा विरोधी पक्षनेते आहेत.
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे मेघालय विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १०वी विधानसभा २०१८ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टी ह्या पक्षाने २३ जागांवर विजय मिळवून भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.
सद्य विधानसभेची रचना
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (41)
- नॅशनल पीपल्स पार्टी (23)
- युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (8)
- पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (4)
- भारतीय जनता पक्ष (2)
- हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (2)
- अपक्ष (2)
विरोधी पक्ष (12)
इतर (7)
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (5)
- खून हिनीवट्रेप नॅशनल अवेकनींग मूव्हमेंट (1)
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (1)