मेक्सिकोटोपणनाव | क्रिकेट वूल्चर्स |
---|
असोसिएशन | मेक्सिको क्रिकेट असोसिएशन |
---|
कर्मचारी |
---|
कर्णधार | तरुण शर्मा |
---|
प्रशिक्षक | जॉन बोनफिग्लिओ |
---|
व्यवस्थापक | जॅक लिटल |
---|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद |
---|
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य[१] (२०१७) |
---|
आयसीसी प्रदेश | अमेरिका |
---|
आयसीसी क्रमवारी | सद्य[२] | सर्वोत्तम | |
---|
आं.टी२० | --- | ४६ (१-मे-२०२१) | |
---|
|
आंतरराष्ट्रीय क्रिकेट |
---|
प्रथम आंतरराष्ट्रीय | १९ मार्च २००६ वि कोस्टा रिका लेडीविले, बेलीझ येथे |
---|
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय |
---|
पहिली आं.टी२० | वि. बेलीझ ॲथलेटिक क्लब रिफॉर्म, नौकाल्पन; २५ एप्रिल २०१९ |
---|
अलीकडील आं.टी२० | वि. आर्जेन्टिना लिमा क्रिकेट आणि फुटबॉल क्लब, लिमा; ६ ऑक्टोबर २०१९ |
---|
आं.टी२० | सामने | विजय/पराभव | |
---|
एकूण[३] | ८ | ३/५ (० बरोबरी, ० निकाल नाही) | |
---|
चालू वर्षी[४] | ० | ०/० (० बरोबरी, ० निकाल नाही) | |
---|
|
|
|
|
१ जानेवारी २०२३ पर्यंत |
मेक्सिको राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेक्सिको देशाचे प्रतिनिधित्व करतो. २००४ मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चे संलग्न सदस्य बनले[५] आणि २००६ मध्ये कोस्टा रिका विरुद्ध त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. संघाने जून २०१० मध्ये आयसीसी अमेरिका चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले आणि २०११ मध्ये कोस्टा रिका येथे आयसीसी अमेरिका विभाग ३ स्पर्धेत भाग घेतला. मेक्सिकोने २०१४ आणि २०१८ मध्ये दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिपमध्ये देखील भाग घेतला आहे आणि दोन्ही वेळा जिंकले आहे. २०१७ मध्ये ते सहयोगी सदस्य झाले.[१]
एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १ जानेवारी २०१९ नंतर मेक्सिको आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण टी२०आ दर्जासाठी पात्र असतील.[६]
संदर्भ