मॅसिडोनिया (रोमन प्रांत)
मॅसिडोनिया (लॅटिन: Provincia Macedoniae, ग्रीक: Επαρχια Μακεδονιας) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स. १४६ मध्ये रोमन प्रजासत्ताकाचा सेनानी क्विंटस सेसिलियस मेटेलियस याने मॅसिडोनच्या राजाचा पराभव केल्यावर हा प्रदेश रोमन साम्राज्यात समाविष्ट झाला.