Jump to content

मॅक्समुल्लर भवन


जर्मन भाषा आणि संस्कृतीच्या प्रसाराकरिता जर्मन सरकारने गटे नावाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेच्या भारतातील सर्व शाखा त्या त्या शहरातील 'मॅक्समुल्लर भवन' नावाच्या इमारतींत आहेत. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये मॅक्समुल्लर भवने असून तेथे जर्मन भाषा प्रशिक्षणाचे वर्ग आणि भाषेच्या देशी-आंतरराष्ट्रीय परीक्षा घेतल्या जातात.

मॅक्समुल्लर भवनात सांस्कृतिक देवाणघेवाण होण्याच्या उद्देशाने ग्रिप्स नाट्य चळवळी सारखे विविध कार्यक्रमही राबवण्यात येतात. भारतीयांना जर्मनीमधील उच्चशिक्षणाच्या संधी, जर्मन साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान वगैरेंची ओळख होण्यासाठी निरनिराळे उपक्रम आयोजित केले जातात. जर्मन भाषेतील साहित्याची ओळख व्हावी यासाठी प्रत्येक मॅक्समुल्लर भवनात एक सुसज्ज ग्रंथालय असते.