मृदुला भाटकर
हायकोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाची चोख जबाबदारी पेलणारे स्त्री व्यक्तिमत्त्व म्हणजे न्या. सौ. मृदुला रमेश भाटकर होय.
१९८२ मध्ये वकिलीची सनद घेतल्यावर त्यांनी पुण्यात सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसच्या माध्यमातून वकिलीचा श्रीगणेशा केला.१९९३ मध्ये त्यांनी मुंबई सेशन्स कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.१० महिने हायकोर्टाचे रजिस्ट्रारपदी काम केल्यानंतर १० फेब्रुवारी २००९ रोजी मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.
मराठी अभिनेते रमेश भाटकर त्यांचे पती आहेत.