मृगजळाचे बांधकाम (ललित लेखसंग्रह)
मृगजळाचे बांधकाम हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा चौथा ललित लेखसंग्रह आहे. इ.स. २००३ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
परिचय
या संग्रहात एकूण २६ ललित लेख आहेत. "निसर्गसत्ता व जीवनसत्ता ह्या दोहोंच्या वर सौंदर्यसत्तेचे अधिष्ठान असते," असा सिद्धान्त या संग्रहात लेखकाने मांडलेला आहे.