मूलभूत बले
आधुनिक भौतिकशास्त्रानुसार विश्वात केवळ खालील ४ प्रकारची बले आहेत. विविध भौतिक क्रियांमध्ये दिसणारी सर्व बले मूलतः याच बलांपैकी एका बलाची रूपे असतात. उदाहरणार्थ, घर्षणाचे बल हे विद्युतचुंबकीय बल आहे.
- कठोर नाभिकीय आंतरक्रिया (strong interaction) - आण्वीय कणांना एकत्र ठेवणारे बल
- सौम्य नाभिकीय आंतरक्रिया (weak interaction)- किरणोत्सार करणारे बल
- गुरुत्व बल किंवा गुरुत्वाकर्षण
- विद्युतचुंबकीय बल (पहा विद्युतचुंबकत्व)
या चार बलांना मूलभूत बले म्हणतात.