मूर्धन्य
ज्या वर्णांचे उच्चार करताना जिभेचा टाळूच्या कठीण भागाला, किंवा जवळच असलेल्या तालुशिखराला स्पर्श होतो त्यांना मूर्धन्य असे म्हणतात.
मूर्धन्य मुळाक्षरे
मूर्धा म्हणजे खरेतर मोठा मेंदू. (स्युर्मूर्धन्या ऋटुरषा । इति पाणिनी.) (ऋटुरषाणाम् मूर्धा । इति अन्य संस्कृत व्याकरणकार). अर्थ असा की, ऋ, ॠ, ट, ठ, ड, ढ, ण, र, ष (आणि ळ) ही मुळाक्षरे मूर्धन्य आहेत. म्हणजे इंग्रजीत Retroflex, हिंदीत पूर्व तालव्य.