Jump to content

मुहम्मदू बुहारी

मुहम्मदू बुहारी

नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२९ मे २०१५
मागील गुडलक जॉनाथन

नायजेरियाचा राष्ट्रप्रमुख
कार्यकाळ
३१ डिसेंबर १९८३ – २७ ऑगस्ट १९८५

जन्म १७ डिसेंबर, १९४२ (1942-12-17) (वय: ८१)
दौरा, ब्रिटिश नायजेरिया
धर्म इस्लाम

मुहम्मदू बुहारी ( १७ डिसेंबर १९४२) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च २०१५ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये बुहारीने विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथनचा २५ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. बुहारी २९ मे २०१५ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेईल.

नायजेरियाचा लष्करी अधिकारी असलेल्या बुहारीने डिसेंबर १९८३ मध्ये एका लष्करी बंडाद्वारे नायजेरियाची सत्ता बळकावली होती. ऑगस्ट १९८५ मध्ये बुहारीला सत्तेवरून हटवून १९८८ पर्यंत बेनिन सिटीमध्ये तुरुंगात डांबण्यात आले. २०३ सालापासून अध्यक्षीय निवडणुका लढवणारा बुहारी अखेर २०१५ साली अध्यक्षपदी निवडून आला.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे