मुळा नदी (निःसंदिग्धीकरण)
- मुळा नदी (अहमदनगर जिल्हा). ही नदी अहमदनगर जिल्ह्यात आहे. ही नदी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या आजोबा या पर्वतात उगम पावते. या नदीवर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील या गावात धरण बांधण्यात आलेले आहे. हे धरण जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांपैकी धरण आहे. या नदीच्या देव, करपारा, महेश ह्या प्रमुख उपनद्या आहे. ती पुढे जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे प्रवरा नदीला मिळते. या नद्यांच्या संगमावर महादेवाचे भव्य मंदिर आहे. येथील वातावरण खूप सुंदर आहे. प्रवरा ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे.
- मुळा नदी ही पुणे जिल्ह्यातील मुळामुठा नद्यांपैकी एक आहे. ती पुढे भीमा नदीला मिळते.