मुरली श्रीशंकर
मुरली श्रीशंकर (२७ मार्च, १९९९:पालक्कड, केरळ, भारत - ) हा एक भारतीय मैदानी खेळाडू आहे जो लांब उडी स्पर्धेत भाग घेतो.[१]
मार्च २०२१ मध्ये पटियाला येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत श्रीशंकरने ८.२६ मीटरची उडी नोंदवून २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली. ही उडी राष्ट्रीय विक्रम होता. [२] ऑलिम्पिकमध्ये, त्याने पात्रता फेरीत ७.६८ मीटरची उडी नोंदवली आणि अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. [३]
संदर्भ
- ^ Kumar, P. K. Ajith (3 April 2022). "Federation Cup: Sreeshankar-Jeswin epic long jump duel lights up day two". Sportstar (इंग्रजी भाषेत). 11 August 2022 रोजी पाहिले.
- ^ "Long Jump: Sreeshankar sets new national record at Federation Cup, books Tokyo Olympics ticket". India Today (इंग्रजी भाषेत). 7 August 2021 रोजी पाहिले.
- ^ "Tokyo Olympics long jump: M. Sreeshankar fails to make cut for final". Sportstar (इंग्रजी भाषेत). 7 August 2021 रोजी पाहिले.