मुचकुंद
मुचकुंद ऋषी याच्याशी गल्लत करू नका.
मुचकुंद ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
संस्कृत नाव-मुचकुंद
- हिंदी- मुचकुंद
- बंगाली-मुचुकुंद
- शास्त्रीय नाव- Pterospurmum suberifolium
वर्णन - हा मोठा वृक्ष असतो. पाने मोठी; फुले जाड,लोमयुक्त आणि सुगंधी ; औषधात फुले वापरतात. ही फुले सावलीत सुकवून ठेवल्यास त्यांचा धर्म नष्ट होत नाही. रसशास्त्र - फुले पाण्यात कुसकरल्याने बोळ उत्पन्न होतो.फुलात उडणारे सुगंधी तेल असते. धर्म - वेदनास्थापन उपयोग - फुले कांजीत वाटून अर्धशिशीत डोक्यावर थापतात. संदर्भ - औषधी संग्रह (लेखक- डॉ. वा.ग.देसाई)