मुक्त पत्रकार
मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही संस्थेला बांधील नसतात. त्यांना त्यांच्या कामासाठी स्वतःच बाजारपेठ शोधावी लागते. आवश्यक कौशल्य, दृष्टिकोन : या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडे बहुश्रुतता, विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण वाचन, स्वतःचे मत स्पष्ट शब्दात लिहिण्याची क्षमता, एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची क्षमता, प्रसंगी संशोधनात्मक काम करण्याची मनाची तयारी, सामाजिक भान, वेळेचे बंधन पाळण्याची हातोटी, उत्कृष्ट आकलन क्षमता, मातृभाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी तसेच शक्य तितक्या इतर भाषेचे ज्ञान असणे, हे त्यांना काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे जाते. वृत्तपत्र/ प्रकाशन व्यवसायाची आवड व त्याचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रवास व चौफेर, चौकस बुद्धिमत्ता आणि कष्ट करण्याची मनाची तयारी आवश्यक आहे.[१]
संदर्भ
- ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=2773:2009-08-25-12-11-48&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116 Archived 2010-01-17 at the Wayback Machine. ची कॅश आहे. 30 Sep 2009 16:56:45 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.