Jump to content

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर म्हणजे चिंतामणीसुत मुदगल. पंडिती परंपरेतील कवींमध्ये प्रथम मुक्तेश्वरांचा विचार करावा लागतो. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात व १७ व्या शतकाच्या पूर्वार्धातील कलाकवी. संत एकनाथ यांच्या मुलीचा मुलगा, अर्थात एकनाथांचा नातू होय. यांचा जन्म, मृत्यू व गुरुपरंपरेबाबत संशोधकांत मतभिन्नता आहे. मुक्तेश्वर हे त्यांच्या आराध्यदैवतचे नाव असून त्यालाच तो लीला विश्वंभर संबोधतो. मुक्तेश्वरांचे गोत्र अत्रि आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी ही कुलदेवता व सोनारीचा भैरव हे कुलदैवत आहेत.

मुक्तेश्वरांनी विविध प्रकारच्या रचना केल्या आहेत. संत आणि पंडित यांच्यातील दुवा म्हणून मुक्तेश्वरांचे लेखन उल्लेखनीय आहे.

ग्रंथ

  • संक्षेपरामायण
  • मुक्तेश्वरी महाभारत

बाह्य दुवे