मुक्ता टिळक
मुक्ता टिळक (१७ ऑगस्ट, १९६५:ग्वाल्हेर - २२ डिसेंबर, २०२२:पुणे) या पुणे महापालिकेच्या माजी महापौर तसेच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदार होत्या. त्या लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी होत्या.[१]
मुक्ता टिळक ह्या पुण्याच्या मुलींच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे काॅलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या टिळक यांनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते. त्या विपणन (मार्केटिंग) विषयाच्या एमबीए होत्या.[२]
त्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेल्या.[३] २२ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ५७ वर्षे होते.[४]
संदर्भ
- ^ "Lokmanya Tilak's Relative, BJP's Mukta Tilak, Is Pune's New Mayor". The Quint (इंग्रजी भाषेत). 2019-08-12 रोजी पाहिले.
- ^ "पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक". Maharashtra Times. 2019-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-12 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat. "Vidhan sabha 2019 : कोथरुडमधून चंद्रकांत पाटील तर कसब्यातून मुक्ता टिळक यांचे नाव निश्चित". Lokmat. 2019-09-30 रोजी पाहिले.
- ^ NewsWire (2022-12-22). "Maha: BJP MLA and Lokmanya Tilak kin Mukta S. Tilak dies at 57 CanIndia News". CanIndia News (इंग्रजी भाषेत). 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-22 रोजी पाहिले.