मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ - २० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुक्ताईनगर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका आणि रावेर तालुक्यातील खिरडी, सावदा ही महसूल मंडळे आणि सावदा नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश होतो. मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
आमदार
वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | चंद्रकांत (भाऊ) निंबाजी पाटील | अपक्ष | |
२०१४ | एकनाथराव गणपतराव खडसे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | एकनाथराव गणपतराव खडसे | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
मुक्ताईनगर विधानसभा २०१९
गेली जवळ जवळ तीस वर्षे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी भा.ज.पा महसूल मंत्री (२०१४-२०१६) एकनाथ खडसे करत होते परंतु २०१९ निवडणुकीत भा. ज. पा. द्वारे त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्यावर त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. जसे की पुण्यातील भोसरी MIDC जमिनीची त्यांनी खरेदी केली असा आरोप होता त्यामुळे त्यानं त्यांच्या पदावरून राजीनामा द्यावा लागला. भा. ज. पा. त्यांना तिकीट देणार नाही व पक्ष त्यांच्यासाठी नवीन जबाबदारी देण्यास इच्छूक आहे असे पक्ष्याने खडसे यांना पूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते.
एकनाथ खडसे यांच्या जागेवर त्यांच्या मुलीला - रोहिणी खडसे - खेवलकरला तिकीट देण्यात आले. खडसे यांनी पक्ष्याचा या निर्णयावर आपण खुश आहोत असे सांगितले आणि नंतर एका आठवड्यानतर आपण व आपली मुलगी पक्ष्याच्या या निर्णयावर नाराज आहोत असे बोलून दाखवले.[१][permanent dead link] [४] जळगाव जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाचा राजीनामा देत बंड पुकारले व अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले होते. त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा आहे असे त्यांचे मत होते.[५]
राष्ट्रवादीचे आधिकृत उमेदवार अड. रविंद्र पाटील यांनी त्यांची उमेदवारी माघारी घेतली. त्यांचे म्हणणे होते की पक्ष वरिष्ठांच्या आदेशावरून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या वेळेस एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा मुक्ताईनगरमध्ये पणाला होती. ते तुफान प्रचार करत होते. त्यांच्या वर महाराष्ट्रात घराणेशाहीचे आरोप पण लागत होते. त्यांच्या सून रक्षा निखिल खडसे या सुद्धा मुक्ताईनगर मधून खासदार आहेत. त्या पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत(२०१४-२०१९, २०१९-present)
* मुक्ताईनगर विधानसभानिवडणुक निकाल २०१९-
नाव | पक्ष | मत |
---|---|---|
चंद्रकांत निंबा पाटील | IND (अपक्ष) | ९०६९८ |
रोहिणी एकनाथ खडसे | भारतीय जनता पार्टी | ८८३६७ |
राहुल अशोक पाटील | वंचित आघाडी | ९७१५ |
भगवान दामू इंगळे | बसपा | १५८३ |
संजू कडु इंगळे | बिमकेपी | १४०१ |
ज्योती महेंद्र पाटील | IND (अपक्ष) | ८८८ |
संजय प्रल्हाद कांडेलकर | IND (अपक्ष) | ५६०[६] |
२०१४ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुक
२०१४ विधानसभा निवडणुक मध्ये भारतीय जनता पक्षाचे एकनाथ खडसे निवडून आले व शिवसेेना पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील द्वितीय क्रमांकावर राहिले. एकनाथ खडसे निवडूून आल्यानंतर महाराष्ट्राचे कृषी, महसूल मंत्री बनले. २०१६ मध्ये त्यांनी या पदांवरून राजीनामा दिला.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ २००९ निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
मुक्ताईनगर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
एकनाथ खडसे | भाजप | ८५७०८ |
रविंद्र प्रहल्लाद पाटिल | राष्ट्रवादी | ६७३१९ |
जगदीश तुकाराम पाटिल | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | ५७८६ |
शैलेश सारदार सिंग | अपक्ष | ३००८ |
पाटिल विशाल भगवान | अपक्ष | १८२५ |
Nikam Santosh Supadu | बसपा | १७६७ |
SK.ASHIK SK.KARIM | Hindustan Janta Party | ७७१ |
PUNJAJI GANPAT CHAUDHARI | अपक्ष | ६८९ |
INGALE SURESH HIRAMAN | भाबम | ४४४ |
DINKAR LODHU GAVAHAL (PATIL) | अपक्ष | ३१३ |
PRATAP SAKHARAM PATIL | जसुश | २१५ |
ASHOK TRYAMBAK INGALE | अपक्ष | १८२ |
INGALE RAVINDRA VAMAN | अपक्ष | १५७ |
IKARAMUDDIN AMINODDIN | अपक्ष | १४७ |
स्रोत
संदर्भ
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
- ^ Dhayade, Kundan Ravindra (१८- ऑक्टोंबर-२०१९). "एकनाथ खडसे- होय मी नाराज आहे, माझ्यावर अन्याय झाला. विधानसभा निवडणूक". बीबीसी न्यूझ | मराठी. रोजी मूळ पानापासून संग्रहित2019-11-30. २०-१०-२०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link) - ^ "भाजपा कडून रोहिणी खडसेयांना उम्मेद्वारी, शिवसेनेची बंडखोरी". tv9 मराठी. रोजी मूळ पानापासून संग्रहित2019-10-23. २३ ऑक्टोंबर २०१९ रोजी पाहिले.
|पहिले नाव=
missing|पहिले नाव=
(सहाय्य);|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link) - ^ "मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक निकाल २०१९-". Times Now. २४-०९-२०१९ रोजी [www.timesnownews.com मूळ पान] Check
|दुवा=
value (सहाय्य) पासून संग्रहित. २४ ऑक्टोंबर २०१९ रोजी पाहिले.|पहिले नाव=
missing|पहिले नाव=
(सहाय्य);|ॲक्सेसदिनांक=, |archive-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
१. https://www.esakal.com/uttar-maharashtra/maharashtra-vidhansabha-2019-muktainagar-rebel-politics-225548%3famp[permanent dead link]