Jump to content

मुकुल शिवपुत्र


मुकुल शिवपुत्र कोमकली

मुकुल शिवपुत्र
आयुष्य
जन्म २५ मार्च, १९५६ (1956-03-25) (वय: ६८)
जन्म स्थान इंदौर, मध्य प्रदेश, भारत
पारिवारिक माहिती
आईभानुमती कंस
वडील कुमार गंधर्व
जोडीदार कै.सुनीता चौघुले - कोमकली
संगीत साधना
गुरू कुमार गंधर्व, के.जी. गिंडे, एम.डी. रामनाथन, बाळकृष्ण आचरेकर
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन
घराणे ग्वाल्हेर
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र संगीत
कारकिर्दीचा काळ इ.स. १९७५ - चालू
गौरव
गौरव प्रतिभागौरव पुरस्कार (प्रतिभावंत कलापिठ - स्पंदनकार प्रतिभा आचरेकर स्मृती पुरस्कार)

मुकुल शिवपुत्र कोमकली (२५ मार्च, १९५६ - हयात) हे भारतातील हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. गायक कुमार गंधर्व हे त्यांचे वडील आणि गायिका भानुमती कंस या त्यांच्या आई आहेत.

गुरु: पं कुमार गंधर्व (ग्वाल्हेर घराणे), भानुमती कंस (ग्वाल्हेर घराणे), एम डी रामनाथन (कर्नाटक संगीत), के जी गिंडे (धृपद धमार), बाळकृष्ण आचरेकर (श्रुतीशास्त्र)

बालपण

मध्यप्रदेशातील 'इंदौर' या गावी मुकुल यांचा जन्म झाला. वडील कुमारगंधर्व यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतल्यावर मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले. भारतातील पाहीली 22 श्रुतीची संवादिनी बनविणारे आचार्य गंगाधरपंत आचरेकर यांचे चिरंजीव बाळकृष्ण आचरेकर यांच्याकडून मुकुल यांनी 1974-75 साली श्रुतीशास्त्राचे संपूर्ण शिक्षण घेतले.

कारकीर्द

मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी गायकीत ते कुमारजींच्या खूप पुढे आहेत. "तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता" असे पंडित वसंतराव देशपांडे म्हणाले होते. ते उद्गार खरे ठरले आहेत. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले.

संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे.

ग्वाल्हेर , आग्रा, आणि जयपूर या तिन्ही घराण्यांची गायकी त्यांच्या कंठात सरस्वतीच्या रूपाने विराजमान आहे.

कुणी जाल का सांगाल का

मुकुल शिवपुत्र हे एका रात्री त्यांच्या घरात गात असताना दुरून कवि अनिल यांनी त्यांचे गाणे ऐकले आणि त्यांनी 'कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का या कोकिळा?, रात्री तरी गाऊं नको, खुलवूं नको आपुला गाळा' या अजरामर गीताची रचना केली. हे गाणे वसंतराव देशपांडे यांनी गायले आहे. संगीतकार यशवंत देव आहेत.

पुरस्कार

  • साहित्यिक ह.मो. मराठे यांच्या हस्ते दिला गेलेला, "स्पंदनकार" साहित्यिक प्रतिभा आचरेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिभावंत कलापिठ तर्फे दिला जाणारा "प्रतिभागौरव" पुरस्कार (१५-३-२०१५)

संदर्भ