मुकुंद देवळालीकर
प्रा. मुकुंदराव बाबूराव देवळालीकर (१९४६ - जुलै, २०१८:कर्जत, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र) हे एक मराठी कवी, नाटककार व पत्रकार, समाजसेवक होते. त्यांच्या धन धन गाऊ, लखलख सोनेरी दुनिया, दुनिया तुझा दरबार अशा कव्वाल्या प्रसिद्ध आहेत.[१][२][३][४]
पुस्तके
सहा काव्यसंग्रह, चार कथासंग्रह, एक नाटक
- उमलती फुले (कवितासंग्रह)
- उमलत्या कळ्या (बालकविता)
- ओंजळ (कथासंग्रह)
- ओवाळणी (कथासंग्रह)
- कथारूप रामायण (कथा) : २०१२ साली ग्रंथालय संचालनालयाने खरेदीसाठी शिफारस केलेले पुस्तक.
- कनक (कवितासंग्रह)
सन्मान आणि पुरस्कार
- कऱ्हाड येथील कवी संमेलनाचे अध्यक्षपद
- दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर ॲवार्ड
- शाहीर कवी आंनद फंदी पुरस्कार
- साहित्य अलंकार
- दलित साहित्य अकादमीचा साहित्यरत्न पुरस्कार
संदर्भ
- ^ "उमलत्या कळ्या-Umalatya Kalya by Prof. Mukund Devlalikar - Pruthviraj Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 23 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "कवी मुकूंद देवळालीकर यांचे निधन". Maharashtra Times. 23 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "कथासंग्रहास पुरस्कार". Maharashtra Times. 23 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "कांकरिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेला प्रारंभ". Divya Marathi. 23 मे 2020 रोजी पाहिले.