मुकुंदराज
मुकुंदराज |
---|
मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. या ग्रंथात एकूण अठरा ओवीबद्ध प्रकरणे आहेत.[१][२][३][४]
परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ. मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस ५ कि.मी अंतरावर आहे. शहरात अमर हबीब यांनी स्थापन केलेले मुकुंदराज कविता ग्रंथालय आहे.
मुकुंदराज कवीवरील मराठी साहित्य
- सार्थ विवेकसिंधु:ह.भ.प.ॲड.दत्तात्रेय महाराज आंधळे
- आद्यकवी श्री मुकुंदराज : एक शोध वाट (ॲड. दत्तात्रेय आंधळे)
- विवेकसिंधू (डॉ. श्री.द. देशमुख)
संदर्भ आणि नोंदी
- ^ "लोकसत्ता:मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा करण्याची मागणी". १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "मराठवाडा नेता[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link] - ^ "लोकसत्ता:मराठी कवितेसाठी". १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "सकाळ". 2011-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)