महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची यादी आणि गृहमंत्रीपदाचा कार्यकाळ
- १९३७ ते १९३९ या कालावधीत बाळ गंगाधर खेर मुख्यमंत्री असताना कन्हैयालाल मुन्शी गृहमंत्री होते.
- १९४६ ते १९५२ या कालावधीत खेर पुन्हा मुख्यमंत्री झाले असताना गृहखाते मोरारजी देसाई यांच्याकडे होते.
- १९५२ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते.
- मारोतराव कन्नमवार (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) यांनी त्यांच्या १ वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत गृहखाते पी.के. ऊर्फ बाळासाहेब सावंत यांना दिले होते.
- डिसेंबर १९६३ मध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी १९६७ च्या विधानसभा निवडणूक होईपर्यंत गृहखात्याचा कारभार बाळासाहेब देसाई यांच्याकडे सुपूर्द केला होता.
- १९६७ च्या निवडणुकांनंतर मात्र वसंतराव नाईक यांनी गृहखाते फेब्रुवारी १९७५पर्यंत स्वतःकडेच ठेवले.
- १९७५ ते ६ मार्च १९७८ या काळात गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच (शंकरराव चव्हाण) सांभाळले.
- ७ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ या अल्पकालावधीसाठी उपमुख्यमंत्री तिरपुडे यांच्याकडे गृहमंत्रीपद होते.
- १८ जुलै १९७८ ते १९९५ : गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीच (आधी शरद पवार आणि नंतर फेब्रुवारी १९८० पासून अंतुले, नंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि नंतर सुधाकरराव नाईक) सांभाळले.
- १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे (मनोहर जोशी, नारायण राणे) आणि उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे असा फॉर्म्युला राबविण्यात आला. राज्यात १९९९पासून काँग्रेस आघाडीने मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत युतीचाच फॉर्म्युला कायम ठेवला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे आणि उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिले. (संदर्भ:http://www.esakal.com/esakal/20090930/4916890409139702086.htm[permanent dead link])
- विलासराव देशमुख
- शिवराज पाटील
- डॉ. पद्मसिंह पाटील
- गोपीनाथ पांडुरंग मुंडे
- छगन भुजबळ
- आर.आर. पाटील
- जयंत पाटील