मुंबई छशिमट–जालना जन शताब्दी एक्सप्रेस
हिंगोली मुंबई जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी हिंगोली ला महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईसोबत जोडते. ह्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरपर्यंत धावणाऱ्या ह्या गाडीचा मार्ग १० मार्च २०२४ पासून हिंगोली पर्यत वाढवण्यात आला.[१]
नावाची व्युत्पत्ती
हिंदी भाषेमध्ये जन या शब्दाचा अर्थ जनता म्हणजे लोक असा आहे. त्यामुळे जन शताब्दी यामधील शब्दाचा अर्थ सर्वसाधारण लोकांसाठी असलेली गाडी असा आहे. जनशताब्दी ही ब-याच मोठया शहरांना जोडणारी स्वस्त दरातील वेगवान गाडी आहे. शताब्दी एक्सप्रेसचे हे लघुत्तम रूप आहे.[२]
छत्रपती संभाजीनगर जन शताब्दी
१२०७१/७२-मुंबईच्या दादर रेल्वे स्थानक आणि छ्त्रपती संंभजीनगर दरम्यान धावणारी ही गाडी होती. मध्ये रेल्वेची ही रोजच्या रेाज वेगात धावणारी गाडी आहे. या गाडीची धाव नंतर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढविण्यात आली. आणि १२०५१/५२ च्या मडगांव जनशताब्दीच्या रेकबरोबर जोडलेली आहे.
गाडी क्रमांक १२०७२ हिंगोली वरून पहाटे ४:२० वाजता निघते आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १६.५० वाजता पोहोचते. ती सरासरी ६५८कि.मी. अंतर १२:३० तासांमध्ये पार करते. छ्त्रपति संंभाजीनगर, मनमाड, नाशिकरोड ,कल्याण, ठाणे आणि दादर याठिकाणी ती थांबा घेते. कसारा आणि इगतपुरी येथे गाडीचे कार्यान्वित थांबे आहेत.[३]
गाडी क्रमांक १२०७१ परतीची गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून १२:१० वाजता निघते आणि हिंगोलीला रात्री १२:३०ला पोहोचते.[४] जालना जनशताब्दी ही ९ डब्यांची गाडी आहे. या गाडीला ६ जनशताब्दी खूर्ची यान, १ वातानुकूलित खूर्ची यान आणि २ मालवाहू डबे जोडलेले आहेत.[५]
दृष्टीक्षेपात गाडीचा तपशील
गाडी क्रमांक | गाडीचे नांव | प्रारंभ | प्रवासाचा दिवस | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१२०७१ | जनशताब्दी एक्सप्रेस[२] | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) | सोमवार | मंगळवार | बुधवार | गुरुवार | शुक्रवार | शनिवार | रविवार |
प्रथम स्तर | व्दितीय स्तर | प्रथम वर्ग | तृतीय स्तर | खूर्चीयान | शयनयान | व्दितीय शयनयान | इंजिन | |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वर्गवारी | नाही | नाही | नाही | नाही | आहे | नाही | आहे | नाही |
डब्यांची संख्या | निरंक | निरंक | निरंक | निरंक | २ | निरंक | १४ | निरंक |
१२०७२ क्रमांक गाडीचा तपशील
गाडी क्रमांक | गाडीचे नांव | प्रारंभ | प्रवासाचा दिवस | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१२०७२ | जनशताब्दी एक्सप्रेस | मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) | सोमवार | मंगळवार | बुधवार | गुरुवार | शुक्रवार | शनिवार | रविवार |
प्रथम स्तर | व्दितीय स्तर | प्रथम वर्ग | तृतीय स्तर | खूर्चीयान | शयनयान | व्दितीय शयनयान | इंजिन | |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वर्गवारी | नाही | नाही | नाही | नाही | आहे | नाही | आहे | नाही |
डब्यांची संख्या | निरंक | निरंक | निरंक | निरंक | २ | निरंक | १४ | निरंक |
संदर्भ
- ^ "आजपासून धावणार जनशताब्दी".
- ^ a b "जनशताब्दी".
- ^ "औरंगाबाद जनशताब्दी-१२०७२". 2014-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-24 रोजी पाहिले.
- ^ "छत्रपती संभाजीनगर जनशताब्दी-१२०७१".
- ^ "इंडियनरेल.जीओव्ही.इन".