Jump to content

मुंडावळी

मुंडावळी हा मराठी लग्नांमध्ये वधू-वरांनी लग्न लागताना कपाळावर बांधायचा एक मोत्याचा दागिना असतो. उपनयन संस्कारात मुंजा मुंडावळी बांधतो. लग्नाच्या दिवशी वापरल्यानंतर तो पुन्हा कधीही कपाळाला बांधत नाहीत. अनेक मराठी कुटुंबात मुंडावळ्यांऐवजी बाशिंग बांधायची रीत आहे.