Jump to content

मी सिंधुताई सपकाळ

मी सिंधुताई सपकाळ
मी सिंधुताई सपकाळ
दिग्दर्शनअनंत महादेवन
निर्मिती बिंदिया खानोलकर
प्रमुख कलाकारतेजस्विनी पंडित
उपेंद्र लिमये
ज्योती चांदेकर
नीना कुलकर्णी
चारुशीला साबळे
संवादसंजय पवार
संगीतअशोक पत्की
पार्श्वगायनदेवकी पंडित
सुरेश वाडकर
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शितशुक्रवार, नोव्हेंबर १९ २०१०


मी सिंधुताई सपकाळ हा इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट सिंधुताई सपकाळांच्या मी वनवासी नामक आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित आहे. अनंत महादेवन याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सिंधुताई सपकाळांवर बेतलेली व्यक्तिरेखा तेजस्विनी पंडित हिने साकारली आहे.

कथानक

चित्रपटाची सुरुवात सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौऱ्याने होते. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरून त्या प्रथमच विमान प्रवास करून अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते. या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅक तंत्राद्वारे होते. जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करून देतात. त्यातून त्यांनी जीवन जगताना दिलेल्या लढ्याची कथा उलगडत जाते.

कलाकार

हे सुद्धा पहा

या चित्रपटात खालील गीते आहेत

  • हे भास्करा क्षितिजावरी या - गीतकार : प्रवीण दवणे, गायन : देवकी पंडित, सुरेश वाडकर
  • कशी ही बोलकी झाली घरे - गीतकार : सुरेश भट, गायन : देवकी पंडित
  • माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार - गीतकार : ग. दि. माडगूळकर, गायन : देवकी पंडित
  • झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता - गीतकार : बाबासाहेब सौदागर, गायन : देवकी पंडित
  • इतकेच मला जाताना सरणावर कळले होते - गीतकार : सुरेश भट, गायन : देवकी पंडित