Jump to content

मी संमेलन

पाचगणीजवळ खिंगर या गावी २४, २५, आणि २६ जुलै २००९ या दिवशी लेखक, कलावंतांनीच परस्परांशी बोलायचे, एकमेकांच्या सहवासात राहायचे आणि आत्मनिवेदन करायचे, अशी कल्पना असणारे छोटेखानी संमेलन लेखक राजन खान यांच्या पुढाकाराने पार पडले.

या संमेलनाचे नाव ‘मी’ संमेलन होते. लेखक, चित्रकार, प्रकाशक, संपादक यांचा सहभाग असलेल्या या साहित्य संमेलनात अध्यक्षबिध्यक्ष या सोपस्कारांना फाटा दिलेला होता. सर्व निमंत्रितांनी मैत्रीत जमायचे आणि एकमेकांच्या कामाची ओळख करून घ्यायची, अशी ही नामी कल्पना होती. प्रत्येक सहभागी निमंत्रिताने अर्धा तास स्वतःबद्दल बोलायचे आणि पुढचा अर्धा तास सर्वांनी प्रश्नोत्तरे, चर्चा यांतून त्या व्यक्तीला अधिक बोलते करायचे अशी ही योजना होती. ' मी ' या विषयावर बोलायचे असल्याने हे 'मी' संमेलन.

कादंबरीकार राजन खान आणि नाटककार दिलीप जगताप यांना ही कल्पना सुचली आणि तिचा पाठपुरावा करून त्यांनी ती अमलातच आणली.

हे सुद्धा पहा

मराठी साहित्य संमेलने