मीना खडीकर
मीना खडीकर | |
---|---|
मीना खडीकर | |
आयुष्य | |
जन्म | ७ सप्टेंबर १९३१ |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
मूळ_गाव | मंगेशी (गोवा) |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
आई | माई मंगेशकर |
वडील | मास्टर दीनानाथ मंगेशकर |
जोडीदार | श्री खडीकर |
नातेवाईक | आशा भोसले लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर उषा मंगेशकर आदिनाथ मंगेशकर राधा मंगेशकर |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
कार्य | पार्श्वगायन, सुगम संगीत |
पेशा | गायकी |
मीना मंगेशकर-खडीकर (जन्म : इ.स. - हयात) या मराठी गायिका व संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गीते गायली आहेत. काही चित्रपटांच्या त्या संगीत दिग्दर्शक होत्या. मराठी बालगीतांना संगीत देण्यासाठी त्या जास्त प्रसिद्ध आहेत. लता मंगेशकर ही त्यांची सख्खी मोठी बहीण. उषा, आशा व हृदयनाथ ही भावंडे आणि दीनानाथ हे वडील. हे सर्वच गायक आहेत/होते.
लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या कैक जाहीर कार्यक्रमांत मीनाताईंचा सहभाग होता. तसेच, अनेक हिंदी सिनेमातही त्यांनी लता मंगेशकरांबरोबर पार्श्वगायन केले आहे. ‘मदर इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटातले ‘दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा’ हे संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले गीत लताबरोबर मीना मंगेशकरांनीही गायले होते.
कारकीर्द :-
संगीत दिलेले चित्रपट
- कानून का शिकार
- माणसाला पंख असतात
- रथ जगन्नाथाचा
- शाबाश सुनबाई
संगीत दिलेली प्रसिद्ध बालगीते
- असावा सुंदर
- खोडी माझी काढाल तर
- ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता
- सांग सांग भोलेनाथ
लिहिलेली पुस्तके
- 'मोठी तिची सावली' हे आत्मचरित्र (हिंदीत 'दीदी और मैं'