मीनाक्षी शेषाद्री
शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्री (तमिळ: மீனாக்ஷி சேஷாத்திரி ; रोमन लिपी: Meenakshi Seshadri) (१६ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ; सिंद्री, झारखंड - हयात) ही तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. हिने वयाच्या १७व्या वर्षी इ.स. १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरुण स्त्री होय.
कारकीर्द
मीनाक्षीने इ.स. १९८२ साली पेंटर बाबू या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटात तिची नायिकेची भूमिका होती व तिच्यासह राजीव गोस्वामी नायकाच्या भूमिकेत होता. त्यानंतर इ.स. १९८३ च्या सुभाष घई-दिग्दर्शित हीरो या चित्रपटाने तिला कीर्ती मिळवून दिली. दामिनी या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मीनाक्षी शेषाद्री चे पान (इंग्लिश मजकूर)