मिसूरी
मिसूरी Missouri | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | जेफरसन सिटी | ||||||||||
मोठे शहर | कॅन्सस सिटी | ||||||||||
सर्वात मोठे महानगर | सेंट लुईस | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत २१वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १,८०,५३३ किमी² | ||||||||||
- रुंदी | ३८५ किमी | ||||||||||
- लांबी | ४८० किमी | ||||||||||
- % पाणी | १.१७ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत १८वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ५९,८८,९२७ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ३९.२/किमी² (अमेरिकेत ३०वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $४६,८६७ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १० ऑगस्ट १८२१ (२४वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-MO | ||||||||||
संकेतस्थळ | www.mo.gov |
मिसूरी (इंग्लिश: Missouri; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य भागात (मिड-वेस्ट) वसलेले मिसूरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १८व्या क्रमांकाचे राज्य आहे.
मिसूरीच्या दक्षिणेला आर्कान्सा, पश्चिमेला कॅन्सस, नैऋत्येला ओक्लाहोमा, वायव्येला नेब्रास्का, उत्तरेला आयोवा, पूर्वेला इलिनॉय व केंटकी तर आग्नेयेला टेनेसी ही राज्ये आहेत. जेफरसन सिटी ही मिसिसिपीची राजधानी, कॅन्सस सिटी हे सर्वात मोठे शहर तर सेंट लुईस हे येथील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. मिसूरी ही मिसिसिपी नदीची सर्वात मोठी उपनदी राज्याच्या मध्यातून पूर्व-पश्चिम दिशेने वाहते व सेंट लुईसजवळ मिसिसिपी नदीला मिळते. अमेरिकेच्या मध्य भागात वसलेले मिसूरी बरेचदा पूर्व व पश्चिम अमेरिकेला वेगळे करणारे राज्य मानले जाते. येथील सेंट लुईस शहर सर्वात पश्चिमेकडील पौव्रात्य शहर तर कॅन्सस सिटी शहर सर्वात पूर्वेकडील पश्चिमात्य शहर अशी संबोधली जातात.
शेती, खाद्य व्यवसाय, रासायनिक उत्पादन हे मिसूरीमधील सर्वात मोठे उद्योग आहेत. येथील वाईन बनवण्याचा उद्योग वेगाने प्रगती करीत आहे.
मोठी शहरे
- कॅन्सस सिटी - ४,५९,७८७
- सेंट लुईस - ३,१९,२९४
- स्प्रिंगफील्ड - १,५९,४९८
गॅलरी
- सेंट लुईसमधील गेटवे आर्च.
- मिसूरीमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- मिसूरी राज्य संसद भवन.
- मिसूरीचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.