मिश्मी जनजाती
मिश्मी किंवा डेंग जनजाती ही प्रामुख्याने तिबेट आणि अरुणाचल प्रदेश या भागात निवास करणारी आदिम जनजाती आहे. इदू मिश्मी, मिजु मिश्मी आणि दिगारो जमाती अशा यांच्या उपजमाती मानल्या जातात.[१]
भौगोलिक स्थान
मध्य अरुणाचल प्रदेशातील ईशान्येकडील डोंगराळ भागात मिश्मी जनजाती राहतात. लोअर दिबांग व्हेली,लोहित आणि अन्जाव जिल्ह्यात यांची वस्ती आहे. यांना तिबेटमध्ये यिदू ल्होबा तर आसाममध्ये छुलीकाटा असे संबोधिले जाते. तरोन ज्यांना दिगारू मिश्मी असेही ,म्हणले जाते ते दिगारू, लोहित या नद्यांच्या प्रदेशात वस्ती करून आहेत.कामान म्हणजे मिजु मिश्मी हे लोहित आणि काबांग नद्यांच्या खो-यात वसलेले आहेत.[२]
भाषा आणि वेशभूषा
यांची तिबेटी-ब्रह्मदेशी भाषा समुहातील भाषा आहे. या जमातीची वेशभूषा, पोशाख हा अरुणाचल प्रदेशातील अन्य जनजातीपेक्षा वेगळा असल्याने त्यांचे वैशिष्ट्य लक्षात येते.[१]
धार्मिक श्रद्धा व परंपरागत समजुती
वाघ हा या जमातीचा आदिम पूर्वज आहे, त्यांचा मोठा भाऊ आहे अशी यांची धारणा आहे.[३] त्यामुळे या जनजातीला वाघाची शिकार करणे मान्य नाही.[४]श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही या जनजातीतील होती अशी या समाजाची धारणा आहे. या जनजातीमधे रुक्मिणी हरण या पौराणिक संकल्पनेवर आधारित नाटके आणि नृत्ये नेहमी सादर केली जातात. यामागे आख्यायिका अशी आहे की श्रीकृष्णाला रुक्मिणीशी विवाह करण्यापासून मिश्मी लोकांनी विरोध केल्याने त्याची शिक्षा म्हणून कृष्णाने त्याना केस काकापाय्ला लावले. यामुळे मिश्मी लोकांनी चुली म्हणजे केस आणि काटा म्हजे कापलेले अशा अर्थाने छुलीकाटा असे संबोधिले जाते.यानिमित्ताने रुक्मिणीचा अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा प्रवास माधवपूर जत्रेच्या निमित्ताने साजरा केला जातो.[५][२] सर्व वस्तूमध्ये आत्मा आहे अशी या जनजातीची समजूत आहे.
नृत्य
दिगारू मिश्मी जनजातीत दोन प्रकारची नृत्ये केली जातात. १. बुइया आणि २. नुइया असे याचे दोन प्रकार मानले जातात.[६]
प्रमुख अन्न
स्वतः पिकविलेला तांदूळ, बाजरी, रताळे यासारखे कंद तसेच घरात तयार केलेली तांदळाची दारू हे यांचे रोजचे अन्न आहे.[७]
उत्सव
१ ते ३ फेब्रुवारी या काळात साजरा होणारा रेह उत्सव येथील प्रमुख उत्सव मानला जातो. नान्यी इन्यीत्या म्हणजेच दैवी मातेची पूजा करण्याचा हा सण आहे. देवीच्या आशीर्वादामुळे समाजात एकोपा, बंधुता आणि मानवता टिकून राहते अशी यांची धारणा आहे.[८]
संदर्भ
- ^ a b "Idu Mishmi | District Lower Dibang Valley, Government of Arunachal Pradesh. | India" (इंग्रजी भाषेत). 2022-04-06 रोजी पाहिले.
- ^ a b "Gujarat festival celebrates Rukmini's Arunachal link, experts say no basis of this myth". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2018-03-28. 2022-04-08 रोजी पाहिले.
- ^ Aiyadurai, Ambika (2021). Tigers Are Our Brothers: Anthropology of Wildlife Conservation in Northeast India (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-012910-1.
- ^ "'Arunachal's Idu Mishmi people regard tigers as their elder brothers'". OnManorama. 2022-04-06 रोजी पाहिले.
- ^ author. "A twist in the myth: Rukmini's vague Arunachal connection | The Arunachal Times" (इंग्रजी भाषेत). 2022-04-08 रोजी पाहिले.
- ^ Gajrani, S. (2004). History, Religion and Culture of India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-8205-065-5.
- ^ "Culture & Heritage | Dibang Valley | India" (इंग्रजी भाषेत). 2022-04-13 रोजी पाहिले.
- ^ Desk, Sentinel Digital (2021-02-01). "Reh, the Festival of Idu Mishmis Celebrated in Arunachal Pradesh - Sentinelassam". www.sentinelassam.com (इंग्रजी भाषेत). 2022-04-13 रोजी पाहिले.