Jump to content

मिशन रोड मैदान

मिशन रोड मैदान
मैदान माहिती
स्थान मॉंग कॉक
स्थापना १९७६
आसनक्षमता ३,५००

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा.२६ जानेवारी २०१६:
हाँग काँग वि. वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा.८ नोव्हेंबर २०१६:
हाँग काँग वि. पापुआ न्यू गिनी
प्रथम २०-२०३० जानेवारी २०१६:
हाँग काँग वि. स्कॉटलंड
अंतिम २०-२०३१ जानेवारी २०१६:
हाँग काँग वि. स्कॉटलंड
यजमान संघ माहिती
हाँग काँग क्रिकेट संघ ()
शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

मिशन रोड मैदान किंवा टिन क्वॉंग रोड रिक्रिएशन मैदान हे मॉंग कॉक, हाँग काँग येथील एक बहुउपयोगी खेळांचे मैदान आहे, जे मुख्यतः क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. १९७६ साली खुल्या झालेल्या ह्या मैदानावरील पहिला सामना हाँग काँग एकादश आणि क्वीन्सलॅंड कोल्ट संघांदरम्यान खेळवला गेला.[]

नोव्हेंबर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (ICC) ह्या मैदानावर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवण्याची संमती असल्याचे जाहीर केले,[] आणि हे मैदान पूर्व आशिया आणि चीन मधील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ठरले.

२६ जानेवारी २०१६ रोजी, ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये हाँग काँग आणि स्कॉटलंड संघांदरम्यान खेळवला गेला.[]. मैदानावर पहिले दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने ह्याच दोन संघांदरम्यान खेळवले गेले.[]

संदर्भ

  1. ^ "हाँग काँग सॅटर्डे एकादश वि क्वीन्सलॅंड कोल्ट". क्रिकेट आर्काईव्ह (इंग्रजी भाषेत). २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "हाँग काँगचा यजमान म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा, १७वा सामना: हाँग काँग वि स्कॉटलंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "नोंदी / मिशन रोड मैदान, मॉंग कॉक, हाँग काँग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.