मिलिंद गुणाजी
मिलिंद गुणाजी हा एक मराठी अभिनेता आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. २०१३ सालच्या ’मस्त भटकंती' या दिवाळी अंकाचे ते अतिथी संपादक आहेत. राणी गुणाजी ही त्यांची पत्नी आहे.