Jump to content

मिलाऊ पूल

मिलाऊ पुलाचे चित्र
मिलाऊ पूल is located in फ्रान्स
मिलाऊ पूल
मिलाऊ पूलाचे फ्रान्समधील स्थान

मिलाऊ पूल (फ्रेंच: le Viaduc de Millau, ऑक्सितान: lo Viaducte de Milhau) हा फ्रान्स दक्षिण भागातील मिदी-पिरेने ह्या प्रदेशाच्या अ‍ॅव्हेरों विभागामधील मिलाऊ ह्या गावाजवळील तार्न नदीच्या खोऱ्यावर बांधलेला एक पूल आहे. १,१२५ फूट उंच असलेला मिलाऊ पूल हा जगातील सर्वांत उंच (सर्वाधिक उंचीवरील नव्हे) पूल आहे. १४ डिसेंबर २००४ साली खुल्या केल्या गेलेल्या ह्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ४० कोटी युरो इतका खर्च आला. पॅरिस ते मॉंतपेलिए दरम्यानच्या गतिमार्गाचा हा एक भाग आहे.

बाह्य दुवे

गुणक: 44°04′46″N 03°01′20″E / 44.07944°N 3.02222°E / 44.07944; 3.02222