मिरज संस्थान (थोरली पाती)
मिरज संस्थान मिरज संस्थान | ||||
| ||||
| ||||
राजधानी | मिरज | |||
सर्वात मोठे शहर | मिरज | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: गोविंद हरि पटवर्धन अंतिम राजा: चिंतामणराव (अप्पासाहेब) पटवर्थन दुसरे | |||
अधिकृत भाषा | मराठी भाषा | |||
लोकसंख्या | ११७,२४५ (इ.स.१९०१) | |||
–घनता | १०४ प्रती चौरस किमी |
मिरज संस्थान हे पेशव्यांच्या काळातली एक जहागिर आणि ब्रिटीशांच्या काळातील संस्थान होते. ह्या संस्थानाचे अधिपत्य पटवर्थन घराण्याकडे होते. पुढे भाऊबंदकीत मिरजेची विभागणी ४-५ संस्थानांमध्ये झाली. सांगली संस्थान हे त्यातीलच एक संस्थान म्हणून प्रसिद्ध पावले.
इतिहास
विजापूरच्या आदिलशहाच्या काळात मिरज ही एक महत्त्वाची जहागिर होती. पुढे ह्या जहागिरीचे नियंत्रण १६६० साली छत्रपती शिवाजी महाराज, १६८६ साली औरंगजेब आणि १७३९ साली छत्रपती शाहू असे हस्तांतरित होत पेशव्यांकडे आले.
गोविंद हरी पटवर्धन हे पहिल्या बाजीरावाच्या काळापासून एक लढवय्या सरदार म्हणून नामवंत होते. पेशव्यांच्या हैदरअली आणि टिपू सुलतानावरील मोहिमांमध्ये गोविंदरावानी भरीव कामगिरी केली. म्हणूनच माधवराव पेशवे यांनी १७६१ साली मिरजेची जहागिर गोविंदरावाना बहाल केली.[१]
गोविंदरावांच्या कारकिर्दीत (१७६१ ते १७७१) मिरजेची भरभराट होऊन ते संस्थान म्हणून नावारूपास आले.
१८२० साली मिरज राज्याचे थोरली पाती (मिरज सीनियर) आणि धाकटी पाती (मिरज ज्युनियर) असे दोन भाग झाले. मिरज संस्थान (थोरली पाती)चे क्षेत्रफळ ६२० किमी२, उत्पन्न ४.३ लक्ष तर लोकसंख्या ८२,००० एवढी होती.[२]
अधिपती
अधिपती | पासून | पर्यंत | टिपा |
---|---|---|---|
गोविंद हरी पटवर्धन | १७६१ | १७७१ | मिरज संस्थान उदयास आले. |
पाडुरंग गोविंद पटवर्धन | १७७६ | १७७७ | हैदरवरील स्वारीत सामील, त्यातच कैद आणि मृत्यू |
हरिहर पांडुरंग पटवर्धन | १७७९ | १७८२ | निपुत्रिक |
चिंतामणि पांडुरंग पटवर्धन | १७८३ | १८५१ | सांगली संस्थानाची स्थापना |