मिन पटेल
मीनल महेश पटेल ऊर्फ मिन पटेल (जुलै ७, इ.स. १९७०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा इंग्लिश राष्ट्रीय क्रिकेट संघातून क्रिकेट खेळणारा भारतीय वंशाचा, निवृत्त पुरुष खेळाडू आहे. तो इंग्लंडकडून २ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला. काउंटी क्रिकेट स्पर्धांमध्ये तो केंट परगण्याचे प्रतिनिधित्व करत असे. तो प्रामुख्याने डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करत असे. डाव्या हाताने गोलंडाजी करणारा पटेल फलंदाजी मात्र उजव्या हाताने करत असे.
बाह्य दुवे
- क्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)
![]() |
---|
![]() |