Jump to content

मितेश भांगडीया

मितेश भांगडीया हे विदर्भातील एक कंत्राटदार आणि विधान परिषद सदस्य आहेत.

समाजसेवा आणि राजकीय कारकीर्द

चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे मितेश भांगडिया

व्यावसायिक कारकीर्द आणि आर्थिक प्रगती

(संदर्भ :http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=225862:2012-05-09-17-14-59&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60 चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था चंद्रपूर ,९ मे २०१२ / लोक्सत्ताचे खास प्रतिनिधी[मृत दुवा] )

कंत्राटदार मितेश भांगडीया यांनी स्वतःच्या नावे ३० कोटी ३१ लाख ४२ हजार २ रुपये जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता २७ कोटी ८४ लाख ५० हजार तसेच पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता १ कोटी ९० लाख १४ हजार ७९ रुपये आणि स्थावर मालमत्ता ७५ लाख रुपये असे सुमारे ६० कोटी ८१ लाख ६ हजार ८१ रुपये किमतीची मालमत्ता जाहीर केली आहे. मितेश भांगडीया यांनी सन २०१०-११ या वित्तीय आयकर वितरण पत्रामध्ये स्वतःचे वार्षिक उत्पन्न ३२ कोटी ९७ लाख ३६ हजार ११० रुपये दाखवले आहे. तर त्यांच्या पत्नी मेघा यांचे उत्पन्न १ लाख ७५ हजार ५७० रुपये दाखवण्यात आले आहे. मितेश भांगडीया यांच्याकडे ८ लाख ९९५ हजार ३३७ रुपयांची रोकड आहे. अ‍ॅक्सिस, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये १ कोटी ३८ लाख १९ हजार ६८३ रुपयांच्या विविध ठेवी आहेत. रोखे, ऋणपत्रे, मॅच्युअल फंडात सुमारे १५ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे ४ लाख ९१ हजार ७४ रुपये किमतीचे १७३ ग्राम सोने आहे. १८ लाख ८८ हजार ७५१ किमतीची स्कोडा येती आणि ८ लाख ८ हजार ६१४ रुपये किमतीची होंडा सीटी कार आहे. अनेक कंपन्या आणि संस्थांमध्ये भागीदारी असून त्या ठिकाणी सुमारे १२ कोटी ९७ लाख ८९ हजार ६२३ रुपयांची गुंतवणूक केली आहे. वरोरा येथे ९.८६ एकर शेतजमीन, चिमूरमध्ये ७.४९ एकर शेतजमीन, नागपूर- सोलमवाडामध्ये ०.९८ एकर शेतजमीन तर पुणे (वाघोली)येथे २ हजार ७०० चौरस फुटाचा प्लॉट आहे. नागपूरमध्ये वाणिज्यिक इमारत असून त्याचे सध्याचे बाजारमूल्य ३० लाख रुपये आहे. चिमूरमध्ये गांधी वार्ड आणि टिळक वार्डातील घरे, नागपुरातील धंतोलीमध्ये श्रीमान पॅलेसमध्ये दोन फ्लॅट, धंतोलीमध्ये भांगडीया हाऊस तसेच सुशील भवन, मुंबईत सांताक्रूज पूर्वमध्ये ७५ लाख रुपये किमतीचा फ्लॅट त्यांच्या नावे आहे. भांगडीया यांनी स्वतःचा व्यवसाय महेंद्र पेट्रोलियम आणि शेती दाखविला आहे. मितेश भांगडीया यांच्या पत्नी मेघा यांच्याकडे ८५ हजार १८२ रुपयांची रोकड आहे. त्यांच्या नावे विविध बँकांमध्ये ठेवी, रोखे, अल्पबचत प्रमाणपत्रे, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी, ३६६ ग्रॅम सोने आहे. मेघा यांच्या नावे चिमूरमध्ये २.९ एकर शेतजमीन, दहेगावमध्ये ८.३९ एकर शेतजमीन, कळमगावमध्ये ८.७२ एकर शेतजमीन, मिनझरीमध्ये १.७ एकर शेतजमीन, नागपूर उंटखानामध्ये ३० लाख रुपये किमतीचा फ्लॅट आहे