मिखाइल गोर्बाचेव
मिखाईल गोर्बाचोव Михаил Горбачёв | |
सोव्हियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ १५ मार्च १९९० – २५ डिसेंबर १९९१ | |
उपराष्ट्रपती | गेनादी यानायेव्ह |
---|---|
मागील | पदनिर्मिती |
पुढील | कोणीही नाही बोरिस येल्त्सिन (रशियाचा राष्ट्राध्यक्ष) |
सोव्हिएत संघाचा चेरमन | |
कार्यकाळ २५ मे १९८९ – १५ मार्च १९९० | |
मागील | पदनिर्मिती |
पुढील | अनातोली लुक्यानोव |
सोव्हिएत संघाचा सर्वोच्च पुढारी | |
कार्यकाळ १ ऑक्टोबर १९८८ – २५ मे १९८९ | |
मागील | कॉन्स्टान्टिन चेरनेन्को |
पुढील | पद बरखास्त |
सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस | |
कार्यकाळ ११ मार्च १९८५ – २४ ऑगस्ट १९९१ | |
मागील | आंद्रेइ ग्रोमिको |
पुढील | कोणीही नाही बोरिस येल्त्सिन (रशियाचा राष्ट्राध्यक्ष) |
जन्म | २ मार्च, १९३१ प्रिवोलनोये, स्ताव्रोपोल क्राय, रशियन सोसाग, सोवियेत संघ |
पत्नी | राइसा गोर्बाचोवा |
गुरुकुल | मॉस्को विद्यापीठ |
व्यवसाय | वकील |
धर्म | नास्तिक |
सही | |
संकेतस्थळ | गोर्बाचेव फाउंडेशन |
मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव (रशियन: Михаи́л Серге́евич Горбачёв; २ मार्च १९३१) हा एक माजी सोव्हिएत राजकारणी आहे. तो सोव्हिएत संघाचा सातवा व अखेरचा राष्ट्रप्रमुख होता. मार्च १९८५ ते ऑगस्ट १९९१ दरम्यान गोर्बाचेव सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस होता.
१९५५ साली कायद्याचे शिक्षण घेत असताना गोर्बाचेवने कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला व लवकरच तो पक्षात कार्यशील बनला. १९७९ साली कार्यकारी समितीचा (पॉलिटब्युरो) सदस्य बनलेला गोर्बाचेव लिओनिद ब्रेझनेवच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस व सोव्हिएत संघाचा राष्ट्रप्रमुख बनला. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेवने परिस्थिती सुधारण्यासाठी ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनररचना) ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेवने केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्याने सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले ज्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला.
प्रमुख पुरस्कार
- १९८७ - इंदिरा गांधी पुरस्कार
- १९९० - नोबेल शांतता पारितोषिक