मास्टर (कलावंत)
जे कलावंत अगदी लहान वयापासून कलाक्षेत्रात असतात त्यांना मराठीत बाल, बाल कलाकार, बेबी किंवा मास्टर म्हणायची पद्धत आहे.
- महाराष्ट्रातील असे कलावंत
- कुमार गंधर्व (शिवपुत्र सिद्राम कोमकल्ली). यांनी वयाच्या सातव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला प्रारंभ केला.
- छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे). वयाच्या दहाव्या वर्षी संगीत नाटकात ससंगीत अभिनय.
- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
- बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस)
- बेबी तबस्सुम
- बेबी नंदा
- बेबी नाझ (सलमा बेग)
- बेबी शकुंतला (उमादेवी नाडगोंडे-माहेरची शकुंतला महाजन)
- मास्टर अविनाश (बालनट गणू अर्थात गणपतराव मोहिते}
- मास्टर कृष्णराव (बालनट मास्टर कृष्णा अर्थात मास्तर कृष्णराव, कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर)
- मास्टर गामा (मसर गुलाम हुसेन गामा -पारशी रंगभूमी-अल्फ्रेड नाटक मंडळीचे कलावंत)
- मास्टर जगन्नाथ (पारशी रंगभूमीचे कलावंत)
- मास्टर छोटू (मराठी चित्रपट संत तुकाराममध्ये बालनट. फ़ौलादी मुक्का, लुटारू ललना, पंजाब मेल, बंबईवाली आदी हिंदी चित्रपटांचे नायक)
- मास्टर दत्ताराम (वळवईकर)
- मास्टर दीनानाथ मंगेशकर
- मास्टर निसार (हिंदी बोलपटांतील आद्य गायक अभिनेता-जन्म १९०१), ’इंद्रसभा’या चित्रपटात त्यांची आणि जहॉंआरा कज्जनबाई यांची एकूण ७१ गाणी होती.)
- मास्टर नैनूराम (पारशी रंगभूमीचे कलावंत)
- मास्टर परशुराम (परशुराम लक्ष्मण सोनिस)
- मास्टर भगवानदास (पारशी रंगभूमीचे कलावंत)
- मास्टर भोगीलाल (पारशी रंगभूमीचे कलावंत)
- मास्टर मोहंमद (लंका दहन, सीता स्वयंवर, राजा हरिश्चंद्र आदी सुमारे ३० हिंदी चित्रपटांतील कलावंत)
- मास्टर मोहन (पारशी रंगभूमीचे कलावंत)
- मास्टर रवि (पद्मिनी कोल्हापुरे नायिका असलेल्या ‘प्रोफेसर की पडोसन’ आणि ‘जमानों को दिखाना है’ या चित्रपटांचे नायक)
- मास्टर विठ्ठल (पहिला हिंदी बोलपट ’आलमआरा’चे नायक)
- मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी)
- मास्टर शांताराम : तबलावादक चंद्रकांत कामत यांचे गायक वडील.
पंजाबी शास्त्रीय गायक
- मास्टर मदन