मासोळी
मासा याच्याशी गल्लत करू नका.
मासोळी हा पायाच्या बोटात घातला जाणारा एक दागिना आहे.
मासोळी हा दागिना स्त्रिया लग्नानंतर दोन्ही पायांच्या बोटांत घालतात. मासोळी ही पायाच्या तिसऱ्या बोटात घालण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. या दागिन्याचा आकार माशासारखा असतो म्हणून त्याला मासोळी म्हणतात. साधारणतः चांदीमध्ये हा दागिना बनवतात. ग्रामीण स्त्रिया मासोळ्या हौसेने घालतात.सोने व चांदि या धातू दोन प्रकारात असतात.माशाच्या रूपाकाराची उठावदार आकृती करून ती जोडव्याच्या वरच्या बाजूने लावली असते. या अलंकाराला मासोळी असे नाव आहे. महाराष्ट्रात नागर स्त्रियांमध्ये कमी परंतु ग्रामीण भागात स्त्रियांच्या बोटांमध्ये हा अलंकार सर्रास आढळतो. मासोळ्या पायाच्या चौथ्या बोटात घालण्याची प्रथा आहे.[१]
संदर्भ
- ^ "सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार". लोकसत्ता. 2014-10-03. 2018-03-20 रोजी पाहिले.