मासिलम गाय
मासिलम गाय हा भारतातील एक शुद्ध देशी गोवंश असून हा प्रामुख्याने मेघालय प्रांतात आढळतो.[१] भारतीय कृषी संशोधन परिषद ने मशागतीचा आणि मांसाहारासाठीचा गोवंश म्हणून याचे प्रमाणीकरण केले आहे.[२]
हा गोवंश मेघालयच्या पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. खासी आणि जनितिया आदिवासी समुदाय याचे पालन पोषण आणि संवर्धन करतो. खासी भाषेत 'मासी' म्हणजे गुरेढोरे आणि 'लम' म्हणजे टेकड्या असा अर्थ होतो, म्हणून या गोवंशाला "मासिलम" असे म्हणतात.[३]
शारीरिक रचना
मासिलम गुरे लहान आकाराची, मजबूत शरीरयष्टीची, बळकट आणि मेघालयाच्या टेकडी परिसंस्थेला अनुकूल अतात. या गोवंशाच्या शरीराचा रंग मुख्यतः काळा, तपकिरी, तपकिरी - राखाडी असा आढळून येतो. गाईमध्ये गळकंबळ आणि खांदा मध्यम आकाराचा तर बैलांमध्ये गळकंबळ आणि खांदा चांगले विकसित दिसून येतात. खांद्यावर केसांचा गुच्छ देखील दिसून येऊ शकतो. शिंगे लहान आणि काळ्या रंगाची असतात.[३][४]
वैशिष्ठे
या गोवंशाचे सरासरी दैनंदिन दूध उत्पादन अडीच ते तीन लिटर असून, एका वेतात दूध उत्पादन ३८५ ते ४५० लिटर पर्यंत आढळते. तर दूध उत्पादनाचा कालावधी १६८ ते १८० दिवस आहे. खासी आणि जनितिया आदिवासी समुदाय याचे पालन पोषण आणि संवर्धन विशेष करून मांसाहार, खतासाठी आणि समजित व सांस्कृतिक परंपरा म्हणून करतो.[३][४]
भारतीय गायीच्या इतर जाती
भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]
संदर्भ
- ^ "राजस्थान में गायें | गायों की नस्ल".
- ^ "Registered Breeds Of Cattle" (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b c "Masilum Cattle". १ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "आईसीएआर द्वारा पंजीकृत देशी गाय की नई नस्ल मासिलम". १ मार्च २०२४ रोजी पाहिले.