Jump to content

माल्टा

माल्टा
Republic of Malta
Repubblika ta' Malta
माल्टाचे प्रजासत्ताक
माल्टाचा ध्वजमाल्टाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: L-Innu Malti
माल्टी गीत
माल्टाचे स्थान
माल्टाचे स्थान
माल्टाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
व्हॅलेटा
अधिकृत भाषाइंग्लिश, माल्टी
इतर प्रमुख भाषा इटालियन
सरकारसांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखजॉर्ज व्हेला
 - पंतप्रधानरॉबर्ट आबेला
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २१ सप्टेंबर १९६४ (युनायटेड किंग्डमपासून
 - प्रजासत्ताक दिन१३ डिसेंबर १९७४ 
युरोपीय संघात प्रवेश१ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ३१६ किमी (२०७वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २००८ ४,४६,५४७ (१७१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१,५६२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९.८१७ अब्ज अमेरिकन डॉलर (१४८वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२३,५८४ अमेरिकन डॉलर (२४वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८२९ (अति उच्च) (३९ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलनयुरो (€)
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१MT
आंतरजाल प्रत्यय.mt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३५६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


माल्टाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Malta; माल्टी: Repubblika ta' Malta) हा दक्षिण युरोपातील एक छोटा द्वीप-देश आहे. माल्टा भूमध्य समुद्रामधील एका द्वीपसमूहावर वसला असून तो इटलीच्या सिसिलीच्या ८० किमी (५० मैल) दक्षिणेस, ट्युनिसियाच्या २८४ किमी (१७६ मैल) पूर्वेस, व लिबियाच्या ३३३ किमी (२०७ मैल) उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत्रफळ केवळ ३१६ चौ. किमी (१२२ चौ. मैल), तर लोकसंख्या सुमारे ४.५ लाख असून माल्टा जगातील सर्वात लहान व सर्वात घनदाट लोकवस्तीच्या देशांपैकी एक आहे.[][][]व्हॅलेटा ही माल्टाची राजधानी असून ती युरोपियन संघामधील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानी आहे.[] माल्टी व इंग्लिश ह्या दोन माल्टामधील राजकीय भाषा आहेत.

माल्टा युरोपियन संघाच सदस्य असून यूरो हे येथील अधिकृत चलन आहे. माल्टाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने येथील पर्यटनावर अवलंबून आहे

इतिहास

भूमध्य समुद्राच्या मधोमध असलेल्या स्थानामुळे माल्टावर ऐतिहासिक काळापासून अनेक महासत्तांचे वर्चस्व राहिले आहे. इ.स.पूर्व ३३२ मध्ये माल्टा कार्थेजच्या अधिपत्याखाली आला. प्युनिकच्या पहिल्यादुसऱ्या युद्धांमध्ये माल्टी लोकांनी रोमनांची बाजू घेतली व लवकरच माल्टा रोमन साम्राज्याच्या प्रगत भाग बनले. इ.स.च्या ४थ्या शतकामध्ये रोमन साम्राज्याची फाळणी झाल्यानंतर माल्टावर बायझेंटाईन साम्राज्याचे अधिपत्य आले.[] ८व्या व ९व्या शतकामध्ये सिसिली व माल्टाच्या अधिपत्यावरून अनेक मुस्लिम-बायझेंटाईन युद्धे झाली व मुस्लिमांनी माल्टावर कब्जा मिळवून तेथील सर्व सुविधा नष्ट केल्या ज्यामुळे माल्टा बेट लोकवस्तीसाठी अयोग्य बनले. परंतु इ.स. १००४८मध्ये मुस्लिमांनी माल्टामध्ये पुन्हा वसाहती निर्माण केल्या. ह्याच काळात अरबीपासून माल्टी भाषेचा उगम झाला.[] इ.स. १०९१ मध्ये ख्रिश्चन धर्मीय नॉर्मन लोकांनी माल्टावर ताबा मिळवला व लवकरच माल्टा सिसिलीच्या राजतंत्राचा भाग बनले. येथे रोमन कॅथलिक धर्म मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला. माल्टाचे मोक्याचे स्थान लक्षात घेता येथे प्रचंड लष्करी सुविधा निर्माण केल्या गेल्या. १२व्या शतकात माल्टा पवित्र रोमन साम्राज्यामध्ये विलिन केले गेले व दुसऱ्या फ्रेडरिकने येथील सर्व मुस्लिम धर्मीय रहिवाशांची हकालपट्टी केली.[]

पुढील अनेक शतके युरोपातील विविध घराण्यांच्या ताब्याखाली राहिल्यानंतर इ.स. १७९८ मध्ये नेपोलियनने माल्टा काबीज केले. नेपोलियनने इजिप्तकडे जाताजाता येथे तैनात केलेल्या मोठ्या फ्रेंच सैन्याने माल्टाची लुटालूट सुरू केली ज्यामुळे स्थानिक माल्टी लोक खवळून उठले व त्यांनी फ्रेंचांना येथून हाकलून लावले. ब्रिटिश साम्राज्याने माल्टींना शस्त्रे व दारूगोळा पुरवला. इ.स. १८०० मध्ये फ्रेंच सेनापतीने शरणागती पत्कारली.[] माल्टी लोकांनी माल्टावर ब्रिटिशांचे अधिपत्य मंजूर केले व माल्टा ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला. १८६९ मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यानंतर भूमध्य समुद्रातील जलवाहतूकीसाठी माल्टा हा महत्त्वाचा थांबा बनला. ब्रिटनहून भारताकडे जाणारी जहाजे माल्टा येथे थांबत असत. दुसऱ्या महायुद्धात अक्ष राष्ट्रांनी माल्टाला वेढा घतला व येथे प्रचंड बॉंबहल्ला चढवला परंतु ब्रिटिश आरमाराने त्यांना चोख उत्तर दिले व नोव्हेंबर १९४२ मध्ये इटली व नाझी जर्मनीचा येथे सपशेल पराभव झाला.

२१ सप्टेंबर १९६४ रोजी ब्रिटनने माल्टाला स्वातंत्र्य मंजूर केले. पुढील १० वर्षे राष्ट्रकुल परिषदेमध्ये व ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या औपचारिक अध्यक्षतेखाली राहिल्यानंतर १३ डिसेंबर १९७४ रोजी माल्टाने प्रजासत्ताक पद्धतीच्या प्रशासनाचा अंगिकार केला. १९८० साली माल्टाने तटस्थतेचे धोरण स्वीकारले. १९८९ साली येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशसोव्हिएत संघाचे राष्ट्रप्रमुख मिखाईल गोर्बाचेव ह्यांदरम्यान झालेल्या महत्त्वाच्या बैठकीने शीत युद्धाचा शेवट झाला.[]

१ मे २००४ रोजी माल्टा युरोपियन संघाचा तर १ जानेवारी २०८ रोजी युरोक्षेत्राचा सदस्य बनला.[१०]

भूगोल

माल्टा हा भूमध्य समुद्रातील एक द्वीपसमूह असून माल्टा, गोझो व कोमिनो ह्या तीन बेटांवर वस्ती आहे तर इतर बेटे निर्मनुष्य आहेत.

हवामान

माल्टाचे हवामान भूमध्य समुद्रीय प्रकारचे आहे व येथील हिवाळे उबदार तर उन्हाळे सौम्य असतात. येथील वार्षिक सरासरी तापमान दिवसा २३ °से (७३ °फॅ) तर रात्री १६ °से (६१ °फॅ) असते. एका परीक्षणानुसार माल्टामधील हवामान जगात सर्वोत्तम मानले गेले आहे.[११]

माल्टा बेटाच्या मध्य भागात; 1985– साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 16.1
(61)
16.0
(60.8)
17.8
(64)
20.0
(68)
24.2
(75.6)
28.5
(83.3)
31.5
(88.7)
31.8
(89.2)
28.4
(83.1)
25.2
(77.4)
21.0
(69.8)
17.5
(63.5)
23.17
(73.7)
दैनंदिन °से (°फॅ) 13.2
(55.8)
13.0
(55.4)
14.6
(58.3)
16.7
(62.1)
20.4
(68.7)
24.4
(75.9)
27.2
(81)
27.7
(81.9)
25.0
(77)
21.9
(71.4)
18.0
(64.4)
14.7
(58.5)
19.73
(67.53)
सरासरी किमान °से (°फॅ) 10.3
(50.5)
9.9
(49.8)
11.3
(52.3)
13.3
(55.9)
16.6
(61.9)
20.3
(68.5)
22.8
(73)
23.6
(74.5)
21.6
(70.9)
18.6
(65.5)
15.0
(59)
11.9
(53.4)
16.27
(61.27)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 94.7
(3.728)
63.4
(2.496)
37.0
(1.457)
26.3
(1.035)
9.2
(0.362)
5.4
(0.213)
0.2
(0.008)
6.0
(0.236)
67.4
(2.654)
77.2
(3.039)
108.6
(4.276)
107.7
(4.24)
603.1
(23.744)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.1 mm)15 12 9 6 3 1 0 1 5 9 13 16 90
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 169.3 178.1 227.2 253.8 309.7 336.9 376.7 352.2 270.0 223.8 195.0 161.2 ३,०५३.९
स्रोत: maltaweather.com (Meteo Malta & MaltaMedia)[१२]

अर्थव्यवस्था

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्याख्येनुसार माल्टा जगातील ३६ विकसित देशांपैकी एक असून येथील राहणीमान उच्च दर्जाचे आहे. येथे अनेक नैसर्गिक बंदरे आहेत ज्यामुळे मालवाहतूकीचे माल्टा हे जगातील प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. बँकिंग व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत. माल्टाला दरवर्षी सुमारे १६ लाख पर्यटक भेट देतात. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न €२१,५०० आहे जे युरोपियन संघाच्या सरासरीच्या ८६ टक्के आहे.

वाहतूक

विमानवाहतूक

माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे.

महामार्ग

माल्टात रस्त्यावरील वाहतूक भारतयुनायटेड किंग्डमप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने होते. युरोपमधील इतर देशांपेक्षा हे वेगळे आहे.

खेळ

फुटबॉल हा माल्टामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "European Microstates". Traveltips24.com. 22 December 2008. 31 March 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "Career guidance in Malta: A Mediterranean microstate in transitio". Ingentaconnect.com. 16 June 2006. 31 March 2009 रोजी पाहिले.
  3. ^ "The Microstate Environmental World Cup: Malta vs. San Marino". Environmentalgraffiti.com. 15 December 2007. 31 March 2009 रोजी पाहिले.
  4. ^ "Top 10 Things to See and Do in Malta". Mercury Direct. 2013-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 04/10/2013 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ Borg, Victor Paul (2001). The Rough Guide to Malta & Gozo. Rough Guides. ISBN 1-85828-680-8.
  6. ^ Wilson, Andrew (2006). Corpus Linguistics Around the World. Rodopi. ISBN 90-420-1836-4.
  7. ^ "Time-Line". AboutMalta.com. 7 October 2007.
  8. ^ Holland, James (2003). Fortress Malta: An Island Under Siege, 1940–1943. Miramax Books. ISBN 1-4013-5186-7.
  9. ^ "1989: Malta summit ends Cold War". BBC: On This Day. 3 December 1989. 1 October 2014 रोजी पाहिले.
  10. ^ "Cyprus and Malta set to join eurozone in 2008". 16 May 2007. 2009-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 October 2007 रोजी पाहिले.
  11. ^ Malta tops International Living’s 2011 Quality of Life Best Climate Index
  12. ^ "Malta's Climate". 2015-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 2013 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

https://kyprianou.com.mt/