माल्कम टर्नबुल
| माल्कम टर्नबुल | |
| कार्यकाळ १५ सप्टेंबर २०१५ – २४ ऑगस्ट २०१८ | |
| राणी | एलिझाबेथ दुसरी |
|---|---|
| उपपंतप्रधान | वॉरन ट्रस |
| मागील | टोनी ॲबट |
| पुढील | स्कॉट मॉरिसन |
लिबरल पक्षाचा अध्यक्ष | |
| कार्यकाळ १४ सप्टेंबर २०१५ – २४ ऑगस्ट २०१८ | |
ऑस्ट्रेलियाचा संसद सदस्य | |
| कार्यकाळ ९ ऑक्टोबर २००४ – ३१ ऑगस्ट २०१८ | |
| जन्म | २४ ऑक्टोबर, १९५४ सिडनी, ऑस्ट्रेलिया |
| राजकीय पक्ष | ऑस्ट्रेलियाची लिबरल पार्टी |
| पत्नी | ल्युसी टर्नबुल |
| गुरुकुल | सिडनी विद्यापीठ |
| धर्म | रोमन कॅथलिक |
माल्कम ब्लाय टर्नबुल (Malcolm Turnbull; २४ ऑक्टोबर १९५४) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा माजी पंतप्रधान व लिबरल पक्षाचा माजी पक्षनेता आहे. सप्टेंबर २०१३ पासून पंतप्रधानपदावर राहिलेल्या टोनी ॲबट सरकारच्या कामगिरीबद्दल लिबरल पक्षामध्ये असंतोष पसरला होता. १४ सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये ॲबटला टर्नबुलने ५४-४४ असे पराभूत केले. पक्षनेतेपद मिळवल्यानंतर टर्नबुलची ऑस्ट्रेलियाचा नवा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. ऑगस्ट २०१८ मध्ये टर्नबुलने पक्षाचे अध्यक्षपद व पंतप्रधानपद ह्या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन राजकारणामधून निवृत्ती पत्कारली.
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत