माल्कम एक्स
माल्कम एक्स | |
---|---|
जन्म | माल्कम लिटल १९ मे १९२५ Omaha, Nebraska |
मृत्यू | २१ फेब्रुवारी, १९६५ (वय ३९) Manhattan, New York |
मृत्यूचे कारण | बंदुकीच्या गोळींने खून |
टोपणनावे | एल हज मलिक एल शबाझ (الحاجّ مالك الشباز) |
पेशा | मंत्री, कार्यकर्ता |
ख्याती | काळा राष्ट्रवाद पॅन-आफ्रिकनवाद |
राजकीय पक्ष | नेशन आॅफ इस्लाम मुस्लिम माॅस्क, आॅरगनायझेशन आॅफ ॲफ्रो-अमेरिकन युनिटी |
जोडीदार | बेटी शाबाझ (लग्न १९५८) |
अपत्ये | अतालाह शाबाझ |
नातेवाईक | अर्ल लिटल लुई हेलेन नाॅर्टन लिटल |
स्वाक्षरी |
माल्कम एक्स (१९२५ - १९६५) हा एक आफ्रिकी-अमेरिकी मुस्लिम मंत्री व मानवाधिकार कार्यकर्ता होता. त्याच्या चाहत्यांसाठी तो अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा धैर्यशील समर्थक होता. अधिकारांसाठी गोरे अमेरिकी काळ्यांच्या विरुद्ध कसे गुन्हे करतात हे सांगण्यात त्याची हयात गेली. ह्यासाठी एक त्याचे निंदक त्याला वर्णभेदाचे व हिंसाचाराचे समर्थन केल्याबद्दल दोष देतात. असे असूनही माल्कम एक्सला आफ्रिकी-अमेरिकी इतिहासातील, श्रेष्ठ व महान लोकांमध्ये गणले जाते.
त्याचे वय ६ असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तो १३ वर्षाचा असताना त्याच्या आईला एका मानसिक रुग्णालयात भरती करण्यात आले, ज्यानंतर तो अनेक फाॅस्टर घरांमध्ये राहिला. १९४६ मध्ये, वय वीस वर्ष असताना, तो चोरीच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात गेला. तुरुंगात असतात तो नेशन आॅफ इस्लाम ह्या संघटनेचा भाग झाला. तेव्हाच त्याने नाव माल्कम लिटल वरून माल्कम एक्स असे बदलून घेतले, कारण लिटल हे नाव गोऱ्या मालकाने त्याच्या पालकांवर थोपले होते, अशी त्याची समजूत होती. १९५२मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तो संघटनेचा सगळ्यात प्रभावी नेता म्हणून पुढे आला. त्याने १२ वर्षे संघटनेचे त्याने नेतृत्व केले. त्याच्या आत्मकथेमध्ये त्याने नेशनचा सदस्य असताना केलेल्या काही गोष्टी अभिमानाने लिहिल्या आहेत, मुख्यतः, त्याचा मोफत व्यसन मुक्ती कार्यक्रम. नेशन ही संघटना काळ्यांचे वर्चस्व, गोऱ्या अमेरिकींना वेगळे करणे, ह्या गोष्टीचे समर्थक होती. मानवाधिकार चळवळीला व एकीकरणाच्या मुद्द्याला नेशनचा नकार होता.
मार्च १९६४ च्या दरम्यान, माल्कमम एक्स नेशन आॅफ इस्लाम व त्याचा नेता एलिजाह मुहम्मद, ह्यांच्याबद्दल नकारात्मक झाला. संघटनेसोबतच्या काळाबद्दल त्याने अनेक वेळा खेद व्यक्त केला व सुन्नी इस्लामला मानायला सुरुवात केली. अफ्रिका व मध्य पूर्वचा काही काळ दौरा केल्यावर, व हज पूर्ण केल्यावर, त्याला एल हज मलिक ए शाबाझ, हे नाव मिळाले. त्याने नेशन आॅफ इस्लामला अस्वीकृत केले, वर्णवादाला नकार दिला, व मुस्लिम माॅस्क, ईंक, व आॅरगनायझेशन आॅफ ॲफ्रो अमेरिकन युनिटी ह्यांची स्थापना केली. त्याचा पॅन-आफ्रिकनवाद, काळ्यांना स्व:अोळख, व काळ्यांना स्वरक्षण ह्या गोष्टींना समर्थन देत राहिला.
२१ फेब्रुवारी १९६५ रोजी नेशन आॅफ इस्लामच्या ३ सदस्यांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली.