मालोजी घोरपडे
मालोजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. वाईच्या लढाईत सरनौबत हंबीरराव मोहिते कामी आल्यानंतर १६८८ मध्ये त्यांची सरनौबतपदी (सरसेनापती) नियुक्ती झाली.
घोरपडे यांचा जन्म कापशी जहागिरीत झाला होता. बाजी घोरपडे हे मालोजी घोरपड्यांचे सावत्र भाऊ होत. मालोजी घोरपड्यांच्या तीन मुलांपैकी संताजी घोरपडे कालांतराने सरनौबत झाले.