Jump to content

मालवणी बोली साहित्य संमेलन

मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन रविवार १३ मे २०१८ रोजी कणकवलीतील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सभागृहात झाले. ज्येष्ठ नाटककार तथा वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते. सिंधुभूमी कला अकादमीने या संमेलनाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते.

६वे मालवणी बोली साहित्य संमेलन २३ जून २०१९ रोजी मुंबईत झाले. मालवणी साहित्यिक, कादंबरीकार प्रभाकर भोगले हे संमेलनाध्यक्ष होते.

मालवणी बोली संमेलनाची सुरुवात १९९३ मध्ये दोडामार्ग-आडाळी येथे करण्यात आली. त्यानंतर चार संमेलने झाली. ४थ्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर होते.

हे सुद्धा पहा