मालपाणी उद्योग समूह
मालपाणी उद्योग समूह हा संगमनेर (जिल्हा अहमदनगर) येथील विविध उद्योगांचा समूह आहे. या उद्योग समूहास शंभर वर्षांची परंपरा आहे. ग्रामीण भागात सुरू झालेला आणि संपूर्ण भारतभर व्यापारात भरारी घेणारा उद्योग समूह म्हणून तो ओळखला जातो. "मालपाणी ग्रुप" हे या उद्योग समूहाचे अधिकृत नाव आहे. या समूहाचे नाव प्रसिद्ध 'गाय छाप जर्दा' या उत्पादनाशी जोडले गेले आहे.
स्थापना
'गाय छाप जर्दा' या उत्पादनाची सुरुवात या मालपाणी उद्योग समूहाने ०९ जुलै १८९४ रोजी केली.[१] दामोदर जगन्नाथ मालपाणी यांनी हा जर्दा भारतीय बाजारपेठेत प्रस्तुत केला. ते पहिले उत्पादक होते.गाय छाप जर्दा बरोबरच या उद्योग समूहाने भारतीय बाजारपेठेत 'माउली' आणि 'बादशहा' या जर्द्याच्या नव्या उत्पादनाची भर टाकली.[२] जर्दा, तंबाखू, चहा, अपारंपारिक उर्जा, पवनचक्की, मनोरंजन, वाटर पार्क, बांधकाम व्यवसाय, हॉटेल्स अशा विविध व्यवसायात या ग्रामीण भागातील उद्योग समूहाने स्थान निर्माण केले आहे. विद्यमान काळात मालपाणी उद्योगसमूहाची उलाढाल एक हजार कोटींची झाली आहे.[३]
व्यवस्थापन
ओंकारनाथ दामोदर मालपाणी हे उद्योगसमूहाचे ते आधुनिक अध्वर्यू मानले जातात. वडील दामोदर यांच्या आग्रहाखातर वैद्यकीय शिक्षण सोडून त्यांनी या व्यवसायात प्रवेश केला तेंव्हा केवळ दोन पोती जर्द्याचे उत्पादन होते.[२] त्यांचा मोठा मुलगा राजेश ओंकारनाथ मालपाणी हे उद्योग समूहाचे विद्यमान चेरमन आहेत. दुसरा मुलगा डॉ. संजय ओंकारनाथ मालपाणी हे संचालक असून ते शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत [४]
उद्योगसमूहाची सामाजिक जबाबदारी
तंबाखू व जर्दा व्यवसायाबरोबरच हा उद्योग समूह अनेक सामाजिक कार्ये आणि सार्वजनिक संस्थाशी जोडला गेला आहे. उद्योगातून मिळणाऱ्या संपत्तीचा विनीयोग संगमनेरचे शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक जीवन समृद्ध करण्यासाठी हा उद्योग समूह नेहमी प्रयत्नशील असतो.[५] सामुदायिक विवाह हा या उद्योग समूहाने गेल्या दहा वर्षांपासून राबविलेला महत्त्वाचा मानला जातो.[६] "व्यावसायिक, भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेची जीवनविषयक गुणवत्ता उन्नतीस नेणे", हे त्यांचे दृष्टी विधान आहे.[३]
येथे भेट द्या
अपारंपारिक उर्जा क्षेत्रात मालपाणी उद्योग समूह [७]
अधिकृत संकेतस्थळ
संदर्भ
- ^ Malpani Group,Company Profile, http://www.indiamart.com/malpani-group/ Archived 2013-02-13 at the Wayback Machine., २९ डिसेंबर २०१५ रोजी पहिले
- ^ a b ओंकारनाथ दामोदर मालपाणी, स्वागताध्यक्ष परिचय- स्मरणिका, १५ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन १६,१७,१८ नोव्हेंबर १९८०, संगमनेर महाविद्यालय, नियतकालिक विभाग, वर्ष १९८०
- ^ a b "संग्रहित प्रत". 2015-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-29 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2015-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-29 रोजी पाहिले.
- ^ संगमनेर फेस्टीवलला प्रारंभ,http://www.lokmat.com/storypage.php?catid=20&newsid=7907753
- ^ "संग्रहित प्रत". 2016-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-29 रोजी पाहिले.
- ^ by CMN Channel · September 30, 2015 http://www.cmnchannel.com/2015/09/30/aparamparik-urja-kshetrat-malpani-udyog-samuh/[permanent dead link]