मार्लेश्वरचा धबधबा
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून १८ किमी अंतरावरील मारळ या गावाजवळ हा मार्लेश्वरचा धबधबा आहे. पश्चिम घाटातील एक अत्यंत प्रेक्षणीय असे हे स्थळ आहे.
मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी आहे, तर रत्नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरुखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी अंतरावर आहे. या मार्गावर पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे कोसळत असतात.
शिव मंदिर
याच परिसरात असलेले मार्लेश्वर शिवमंदिर प्रेक्षणीय असून कोकणातील ग्रामस्थांचे ते श्रद्धास्थान आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ गुडेकर शांताराम. "मार्लेश्वरला भेट (११. १०. २०१६)".[permanent dead link]