मार्च ९
मार्च ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६८ वा किंवा लीप वर्षात ६९ वा दिवस असतो.
ठळक घटना
सहावे शतक
- ५९० - बहराम सहावा पर्शियाच्या राजेपदी.
एकोणिसावे शतक
- १८४७ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - अमेरिकेने मेक्सिकोच्या व्हेरा क्रुझ शहरावर चढाई केली.
विसावे शतक
- १९३५ - अॅडॉल्फ हिटलरने जर्मन वायुदल लुफ्तवाफेची स्थापना केल्याचे जाहीर केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी.२९ बॉम्बफेकी विमानांनी जपानची राजधानी टोक्योवर तुफान बॉम्बहल्ले केले. १,००,०००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
- १९५७ - अलास्काच्या अँड्रियानोफ द्वीपसमूहाजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.१ तीव्रतेचा भूकंप झाला त्यामुळे ५० फूटी त्सुनामी तयार झाले.
- १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
- १९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला.
- १९७६ - इटलीच्या कॅव्हालीझ स्की रिसॉर्टवर केबलकारला अपघात. ४२ ठार.
- १९९२ - हिंदी साहित्यिक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के.के. बिर्ला प्रतिष्ठान तर्फे पहिला सरस्वती पुरस्कार प्रदान.
एकविसावे शतक
- २००४ - पाकिस्तानने २,००० कि.मी. पल्ल्याचे शाहीन-२ (हत्फ-६) या क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण केले.
- २००६ - एन्सेलाडस या शनिच्या चंद्रावर द्रवरूपात पाणी असल्याचा शोध लागला.
- २००८ - गोव्याचे राज्यपाल एस.सी. जमीर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार घेतला.
- २०१८ - बिप्लब कुमार देब त्रिपुराचे १०वे मुख्यमंत्री झाले.
जन्म
- १२८५ - गो-निजो जपानी सम्राट.
- १६२९ - अलेक्सिस पहिला, रशियाचा झार.
- १८६३ - भाऊराव बापूजी कोल्हटकर, मराठी गायक आणि नट.
- १८८७ - फिल मीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९० - व्याचेस्लाव्ह मोलोटोव्ह, रशियन राजकारणी.
- १८९४ - फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
- १८९९ - यशवंत दिनकर पेंढारकर, मराठी कवी.
- १९२९ - डेसमंड हॉइट, गयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.
- १९३० - युसुफखान महंमद पठाण, मराठी लेखक, संतसाहित्याचे अभ्यासक.
- १९३१ - डॉ. करणसिंग, भारतीय परराष्ट्रमंत्री
- १९३८ - हरिकृष्ण देवसरे, मराठी बालसाहित्यकार व संपादक
- १९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.
- १९५१ - उस्ताद झाकिर हुसैन अल्लारखॉं कुरेशी, भारतीयतबलावादक.
- १९५६ - शशी थरूर, केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ.
- १९७० - नवीन जिंदाल, भारतीय उद्योगपती.
- १९८५ - पार्थिव पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू .
मृत्यू
- १२०२ - स्वेर, नॉर्वेचा राजा.
- १६५० - संत तुकाराम.
- १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट.
- १९६९ - सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी, भारतीय उद्योजक, संसदसदस्य.
- १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
- १९९२ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- १९९४ - देविका राणी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- २००० - उषा मराठे–खेर, मराठी चित्रपट अभिनेत्री.
- २००३ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१२ - जॉय मुखर्जी, हिंदी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक.
- २०१७ - वि.भा. देशपांडे, मराठी नाट्य समीक्षक व लेखक.
- २०१८ - पतंगराव कदम, भारतीय राजकीय नेते.
प्रतिवार्षिक पालन
- शिक्षक दिन - लेबेनॉन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - मार्च १० - मार्च ११ - (मार्च महिना)