मार्च २६
मार्च २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८५ वा किंवा लीप वर्षात ८६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अकरावे शतक
- १०२६ - पोप जॉन एकोणिसाव्याने कॉन्राड दुसऱ्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९०२ - नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व आणि नेतृत्व देशमान्य झाले.
- १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.
एकविसावे शतक
जन्म
- १८४९ - एडविन एव्हान्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८६२ - डिकी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८७४ - जॅक मेसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०२ - सिसिल ऱ्होड्स, इंग्लिश शोधक.
- १९११ - सर बर्नार्ड कार्ट्झ, जर्मन-ब्रिटिश वैद्यकशास्त्रज्ञ.
- १९१४ - रे रॉबिन्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१६ - बिल एडरिच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - मकसूद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५० - ग्रॅहाम बार्लो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - विक्रम राठोड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८५ - प्रॉस्पर उत्सेया, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९३८ - लक्ष्मीनाथ बेझबरुआ, ज्येष्ठ असमिया साहित्यिक.
- १९९६ - के. के. हेब्बर, भारतीय चित्रकार.
- १९९७ - नवकमल फिरोदिया, ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती.
- १९९८ - डॉ. शांतिनाथ देसाई, कन्नड साहित्यिक.
- १९९९ - आनंद शंकर, संगीतकार.
- २००१ - जनार्दन हरी पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी.
- २००३ - डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन, अमेरिकन सेनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारा नेता.
- २००३ - हरेन पंड्या, गुजरातचे माजी मंत्री(हत्या).
- २००३ - देविदास सडेकर, मराठी पत्रकार.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - बांगलादेश.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २४ - मार्च २५ - मार्च २६ - मार्च २७ - मार्च २८ - (मार्च महिना)