मार्च २३
मार्च २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८२ वा किंवा लीप वर्षात ८३ वा दिवस असतो.
हा जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी १९५० साली जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली होती.
ठळक घटना
अठरावे शतक
- १७७५ - अमेरिकन क्रांतीदरम्यान पॅट्रिक हेन्रीने आपले रिचमंड, व्हर्जिनिया येथे मला स्वातंत्र्य द्या, नाहीतर मला मृत्यू द्या हे भाषण केले.
एकोणिसावे शतक
- १८०१ - रशियाचा झार पॉल पहिल्याची हत्या.
- १८३९ - बॉस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ.के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग.
- १८४८ - जॉन विक्लिफ या जहाजातून स्कॉटिश लोक न्यू झीलंडच्या ड्युनेडिन शहराजवळ उतरले व त्यांनी पुढे तेथे वसाहत निर्माण केली.
- १८५७ - न्यू यॉर्क शहरात पहिले उद्वाहक(लिफ्ट) सुरू करण्यात आली.
विसावे शतक
- १९३१ - भारतीय क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी.
- १९४२ - जपानी सैन्याने अंदमान बेटे काबीज केली.
- १९५० - जागतिक हवामान संघटनेची स्थापना.
एकविसावे शतक
- २००१ - रशियाचे मिर हे अंतराळ-स्थानक पृथ्वीवर कोसळले.
- २००३ - २००३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर मात.
- २००५ - टेक्सास सिटी येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट होऊन १५ कामगार मृत्युमुखी पडले.
- २००७ - इराणच्या आरमाराने रॉयल नेव्हीच्या सैनिकांना पकडले.
जन्म
- १६४५ - विल्यम किड, चाचा.
- १६९९ - जॉन बार्ट्राम, अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ.
- १७२३ - आगा मोहम्मद खान घजर, इराणचा राजा.
- १७४९ - पिएर सिमॉन दि लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.
- १८२३ - स्कायलर कोलफॅक्स, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १८३१ - एडुआर्ड श्लेगिन्ट्वाइट, जर्मन लेखक.
- १८८१ - रॉजर मार्टिन दु गार्ड, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १८८१ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १८८७ - फेलिक्स युसुपोव्ह, रास्पुतिनचा मारेकरी.
- १९१० - डॉ. राममनोहर लोहिया : भारतीय स्वातंत्र्यसैनिक
- १९१२ - वर्नर फॉन ब्रॉन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता.
- १९२६ - रवींद्र पिंगे : मराठी लेखक
- १९३१ - व्हिक्टर कॉर्चनॉय, रशियन बुद्धिबळपटू.
- १९३८ - मेनार्ड जॅक्सन, अटलांटाचा पहिला श्यामवर्णीय महापौर.
- १९६८ - मायकेल आथरटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - इमरान हाश्मी, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९९८ - हजरतुल्लाह झझई, अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
- प्रजासत्ताकदिन - पाकिस्तान.
- जागतिक हवामान दिन,
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २१ - मार्च २२ - मार्च २३ - मार्च २४ - मार्च २५ - (मार्च महिना)