मार्च १६
मार्च १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७५ वा किंवा लीप वर्षात ७६ वा दिवस असतो.
ठळक घटना
बारावे शतक
- ११९० - ख्रिश्चनधर्मीयांनी इंग्लंडच्या यॉर्क शहरात ज्यू व्यक्तींचे सक्तीने धर्मांतर सुरू केले. धर्मांतर न करून घेणाऱ्यांना मृत्यूदंड दिला गेला. अनेक ज्यूंनी ख्रिश्चन होण्यापेक्षा आत्महत्त्या करणे पसंत केले.
सोळावे शतक
- १५२१ - फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोचला
एकोणिसावे शतक
- १८१५ - विल्यम पहिल्याने स्वतःला नेदरलॅंड्सचा राजा घोषित केले.
- १८१८ - कांचा रायादाची लढाई - होजे दि सान मार्टिनच्या स्पॅनिश सैन्याने चिलीचा पराभव केला.
विसावे शतक
- १९२६ - रॉबर्ट गॉडार्डने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
- १९६२ - १०७ प्रवासी असलेले सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान पॅसिफिक महासागरात गायब झाले.
- १९६३ - बाली बेटावरील माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक. ११,००० ठार.
- १९६८ - व्हियेतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - अमेरिकेच्या सैन्याने ३५० ते ५०० व्हियेतनामी नागरिकांची हत्या केली.
- १९६९ - व्हेनेझुएलाच्या माराकैबो विमानतळावर डी.सी. ९ प्रकारचे विमान उड्डाण करताच कोसळले. १५५ ठार.
- १९७६ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान हॅरोल्ड विल्सनने राजीनामा दिला.
- १९७८ - तेलवाहू जहाज अमोको कॅडिझ फ्रांसच्या किनाऱ्याजवळ खडकांवर आदळले. काही वेळाने या प्रचंड जहाजाचे दोन तुकडे झाले.
- १९८८ - इराकने हलाब्जा या कुर्दिस्तानमधील शहरावर विषारी वायुने हल्ला केला. हजारो मृत्युमुखी.
- १९९३ - अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर प्रचंड हिमवादळ. १८४ ठार.
- १९९५ - अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृतरीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली.
- १९९८ - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यूंचे शिरकाण सुरू असताना त्याविरुद्ध आवाज न उठवल्याबद्दल पोप जॉन पॉल दुसऱ्याने ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने जाहीर माफी मागितली.
एकविसावे शतक
- २००५ - सम्राट कनिष्क या एर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली.
- २००७ - २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलॅंड्सच्या डान व्हान बुंगेच्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे.
जन्म
- १७५१ - जेम्स मॅडिसन, अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष.
- १७८९ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८०० - निंको, जपानी सम्राट.
- १८७७ - मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा.
- १९४१ - रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा.
- १९५९ - जेन्स स्टोल्टेनबर्ग, नॉर्वेचा पंतप्रधान.
मृत्यू
- ४५५ - व्हॅलेन्टिनियन तिसरा, रोमन सम्राट.
- १९४५ - गणेश दामोदर सावरकर.
प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्रीय लसीकरण दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १४ - मार्च १५ - मार्च १६ - मार्च १७ - मार्च १८ - (मार्च महिना)